प्राथमिक शिक्षकांची ३७२ पदे व माध्यमिक शिक्षकांचीही पदे भरण्यात येणार

नवी मुंबई महापालिकेतील शिक्षण विभागाच्या पदांना व आकृतिबंधाला मान्यता लवकरच पदभरती-उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई प्रतिनिधी  : नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील २९ प्राथमिक शिक्षकांची मुख्याध्यापक पदावर पदोन्नतीने नेमणूक करण्यात आली असून, प्राथमिक शिक्षकांची ३७२ पदे व माध्यमिक शिक्षकांचीही पदे सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर भरण्यात येणार आहेत. तोपर्यंत बाह्य यंत्रणेद्वारे ही पदे भरण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत दिली.

   नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मुख्याध्यापकांची नेमणूक करून शिक्षकांची भरती करण्याबाबत सदस्य रमेश पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते.

    मंत्री सामंत म्हणाले की “शिक्षण विभागातील २९ प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण विभागाकरिता विविध संवर्गातील पदे निर्माण करण्यास व शिक्षण विभागाच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार शिक्षकांची पदे सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर भरण्यात येतील” असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८