मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी 2025 पासून करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच यांत्रिक व तांत्रिक अशा उर्वरित आठ विभागांच्या परीक्षेबाबतही अहवाल मागवून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली.राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याच्या निर्णयाबाबत सदस्य विलास पोतनीस यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले. तर, उपप्रश्नास उपमुख्यमंत्री यांनी उत्तर दिले.
मंत्री पाटील म्हणाले की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने सन 2025 सालापासून घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८