मुंबई प्रतिनिधी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबीर (सरकार आपल्या दारी) उपक्रमांतर्गत महिलांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या फिरत्या वाहनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे झाले. यावेळी मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव उपस्थित होते.
१९ एप्रिल पासून ते ३१ मे पर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत मुंबईत ‘सरकार आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू असलेल्या महापालिका वॉर्डमध्ये फिरणार असून, या वाहनावरच्या एल ई डी स्क्रीनच्या माध्यमातून महिलांसाठी शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८