सातारा प्रतिनिधी : प्लास्टिक हे आरोग्यासोबतच पर्यावरणासाठीही हानिकारक आहे. त्यामुळे महाबळेश्वर पाचगणी ही गिरिस्थाने प्लास्टिकमुक्त करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर पाचगणी व इतर परिसरातील पर्यटन विषयक विविध विभागांकडील कामांबाबत आढावा बैठक महाबळेश्वर येथील राजभवन येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार श्रीकांत शिंदे आमदार मकरंद पाटील जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अस्तित्वात असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वन विभागाने परवानगी विचारू नये अशा सूचना देऊन मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मंजूर केलेल्या कामांच्या निविदा लवकरात लवकर काढाव्यात पार्किंगला शिस्त लावण्यासाठी उपाययोजना कराव्यात, त्यासाठी नगरपरिषदेने शंभर वाहतूक वॉर्डन पुरवावेत पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावरील अतिक्रमणे दूर करुन साबणे रस्त्याचे काम नियोजनाप्रमाणे करण्यात यावे अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या. बैठकीमध्ये वेण्णा लेक परिसर विकास पार्किंग तसेच सुशोभीकरण या विषयी ही चर्चा करण्यात आली.
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८