राजधानीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

वी दिल्ली प्रतिनिधी :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती  महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली.कस्तुरबा गांधी मार्ग स्थित नवीन महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात खासदार हेमंत पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळयास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

   कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित जयंतीच्या कार्यक्रमात  प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

   महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८