वनमंञी मुनगंटीवार यांनी वनसंरक्षण पद भरतीची वाढवली मुदत...

मुंबई प्रतिनिधी : वन विभागाच्या वनरक्षक पदाच्याभरतीसाठी सरोवर डाऊन असल्यामुळे EWS व नाॅनक्रीमिलीयर मिळत नसल्याने  मुदतवाढ करण्यासाठी वनमंञी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आनंद गोसकी यांनी केली मागणी केली होती. गोसकी यांच्या मागणीला यश आल्यावर सर्व स्तरावर गोसकी यांचे कौतुक होत आहे.

  अनेक युवक वनरक्षक पदाच्या भरतीसाठी शेवटची तारीख 30/06/2023 पर्यंत मुदत दिली होती परंतू  सोलापूरातील व ईतर भागातील  युवक मोठ्या प्रमाणात शेवटची तारीख जवळ आल्याने तहसिल कार्यालय येथे विविध प्रमाणपञासाठी  युवक खेटे घालत होते परंतू टेक्निकल प्राॅब्लेम असल्याने सर्वर डाउन असल्याचे तहसिल कार्यालयातुन EWS व नाॅनक्रिमिलीयर दाखल मिळत नसल्याने ईच्छुक विद्यार्थांचे नुकसान होता कामा नये म्हणून  थेट भाजपचे कार्यकर्ते आनंद गोसकी यांनी वनमंञी सुधीर  मुनगंटीवार यांना वनरक्षक भरतीची मुदत वाढवावी असा आग्रह केला होता.

  सुधीर मुनगंटीवार यांनी दखल घेत आनंद गोसकी यांच्या प्रयत्नाला यश आल्याने सर्व स्तरावर ईच्छुकांकडुन कौतुक होत आहे वनमंञी सुधीर मुनगंटीवार यांनी मुदत  वाढ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आनंद गोसकी यांना सांगितले होत गोसकी यांच्या प्रयत्नाला यश आल्याने मुनगंटीवार यांचे ही आभार मानले. 03 जुलै 2023 पर्यंत मुदतवाढ करण्यात आल्याचे उपवनसंरक्षक नागपूर यांच्याकडुन जाहीर सुचना देण्यात आल्याचे वनमंञी कार्यालयातुन माहिती दिल्याचे गोसकी यांनी सांगितले.यासंदर्भात 30 जूनला जाहीर सुचना पञ काढण्यात आले.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८