मुंबई प्रतिनिधी चित्रलेखा रासने : राज्य सरकारतर्फे देण्यात येणारे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची आज (दि. 14) क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदे घेऊन घोषणा केली.यावेळी 2019-20 2020-21 2021-22 या तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. सन २०१९-२० चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार ठाण्याच्या श्रीकांत शरदचंद्र वाड यांना जाहीर झाला.
विविध क्रीडा प्रकारातं प्रावीण्य मिळवणाऱ्या खेळाडूंच्या सन्मानार्थ दिल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा करतांना गिरीश महाजन म्हणाले राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जतन व संवर्धन व्हावा क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या क्रीडा महर्षि मार्गदर्शक खेळाडू यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिले जातात.सन 2019-20 चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार ठाण्याच्या श्रीकांत शरदचंद्र वाड यांना जाहीर झाला.तर २०२१-२२ चा जीवनगौरव पुरस्कार आदिल जहांगीर सुमारीवाला यांना जाहीर झाल्याची माहीती महाजन यांनी दिली. सरकारने साताऱ्याच्या स्नेहल विष्णू मांढरे यांनाही शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर केला आहे. तिरंदाजी या खेळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्नेहल यांना 2019-20 या वर्षाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.वाई येथे चंद्रकांत भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहल यांनी तिरंदाजीचे प्रशिक्षण घेतले.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत तिरंदाजी या खेळात त्यांनी यश संपादन केले.
दरम्यान या पुरस्कारांमध्ये उल्लेखलेल्या तीन वर्षांच्या पुरस्कारांमध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) साहसी पुरस्कार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) यांचा समावेश आहे. तीन वर्षातील एकून ११६ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दिगंबर वाघ