महाराष्ट्राचा पहिलाच उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर

मुंई प्रतिनिधी चित्रलेखा रासने : प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना आणखी एक सन्मान मिळाला आहे.महाराष्ट्र राज्याचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार टाटा यांना जाहीर करण्यात आला आहे.राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली.महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर या वर्षीपासून उद्योगरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे.राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याच्य दृष्टीने उद्योगांना सर्व प्रकारच्या मंजुऱ्या एकाच ठिकाणी देण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या मैत्री कक्षाच्या कार्यवाहीत सुधारणा करणारे महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा विधेयक विधानपरिषदेत मंजूर करण्यात आले.यावेळी चर्चेला उत्तर देताना सामंत यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत पहिला पुरस्कार टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

  रतन टाटा हे टाटा उद्योग समूहाचे विद्यमान अध्यक्ष आहेत.उद्योग आणि व्यापार या क्षेत्रात चांगल्या कामगिरीसाठी सन 2000 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.त्यांच्याकडे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून मानद डॉक्टरेट आहे.नोव्हेंबर 2007 मध्ये फॉर्च्यून मासिकाने त्यांना व्यवसायातील 25 प्रभावशाली लोकांपैकी एक असल्याचे जाहीर केले होते.मे 2008 मध्ये टाटा यांचा समावेश टाइम मासिकाच्या 2008 च्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत करण्यात आला होता.

  रतन टाटा यांना यावर्षीच ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाने सन्मानित करण्यात आले होते.या व्यतिरिक्त टाटा यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८