झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला उपमुख्यमंत्री पवार यांची भेट

पुणे प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण निगडी येथील शरदनगर आणि दुर्गानगरच्या 670 झोपडीधारक सभासदांच्या पुनर्वसन प्रकल्पाला भेट दिली. शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणारे काम अधिकाऱ्यांनी करावे अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केली.यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह पोलीस आयुक्त विनय चौबे सुनील नहार आदी उपस्थित होते.

  पवार यांनी सदनिकातील सुविधा सौर उर्जेची व्यवस्था सुरक्षा देखभाल आणि स्वच्छता परिसरातील वृक्षारोपण जलपुनर्भरण आदीविषयी माहिती घेतली.परिसरात स्वच्छता राखावी प्रकल्पातील विविध सेवांसाठी स्थानिकांना संधी द्यावी अशा सूचना त्यांनी केल्या.पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दोन झोपडीधारकांना सदनिकांचे हस्तांतरण केले. इमारतीत चांगल्या सुविधा देण्यात आल्या असून त्याचा वापर नीटनेटका करावा  घरासोबत इमारतही स्वच्छ व सुंदर राहील असा सर्वांनी प्रयत्न करावा असे त्यांनी सांगितले.मेट्रो सुविधा निगडीपर्यंत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.महानगरपालिका आयुक्त सिंह यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली.

मोरया गोसावी समाधी मंदिराला भेट

उपमुख्यमंत्री पवार यांनी श्री मोरया गोसावी समाधी मंदिराला भेट देऊन समाधीचे दर्शन घेतले आणि गणेशाची आरती केली. त्यांनी पिंपरी चिंचवड येथील विविध गणेश मंडळांना भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८