मुंबई प्रतिनिधी चित्रलेखा रासने : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध ज्या वाघनखांनी केली ती ब्रिटनमधून भारतात परत आणण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार ही वाघनखं परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला झाला असून लवकरच ही वाघनखं भारतात परत येतील असं सांगितलं होतं. दरम्यान तीन वर्षासाठी ही वाघनखं भारताला दिली जातील असं राज्य सांस्कृतिक कार्य विभागाने सांगितलं.छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाला मारण्यासाठी जी वाघनखं वापरली होती त्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड कुतूहल आहे. ही वाघनखं सध्या ब्रिटनच्या ताब्यात आहेत. मात्र आता लवकरच सर्वसामान्यांना या वाघनखांचं दर्शन घेता येणार आहे. ही वाघनखं 16 नोव्हेंबरला मुंबईत येणार आहेत.
वाघनखं परत आणण्यासाठी सुधीर मुनगंटीवार हे १ ऑक्टोबरला रात्री लंडनला जाणार आहेत. लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयासोबत 3 ऑक्टोबरला करार होणार आहे. पुढील तीन वर्षासाठी ही वाघनखं भारतात असणार आहेत. सांस्कृतिक विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार, व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय 3 वर्षासाठी ही वाघनखं महाराष्ट्र सरकारला देण्यास तयार झालं.मुबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालय आणि कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेस या चार संग्रहालयांमध्ये ही मौल्यवान शस्त्रं सामान्य नगरिकांना पाहण्यासाठी ठेवली जातील असं सरकारने म्हटलं आहे.
लंडनमधून वाघ नखं परत आणण्याबाबत सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यासाठी राज्य सरकारने 11 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती वाघ नखांचे प्रदर्शन आणि राज्यातील सार्वजनिक कार्यक्रमांच्या योजनांना अंतिम रुप देईल.11 सदस्यीय समिती कोण ? 11 सदस्यीय समितीचे अध्यक्ष सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आहेत. यामध्ये सरकारी अधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीमध्ये पोलीस महासंचालक मुंबई आणि नागपूरचे पोलीस आयुक्त राज्य पुरातत्व संचालनालय आणि संग्रहालयाचे संचालक तेजस गर्गे यांचाही समावेश आहे.