महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी रजनीश सेठ यांची नियुक्ती

मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदावर राज्याचे माजी पोलीस महासंचालक रजनीश सेठ नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या आदेशानुसार सेठ यांच्या नियुक्तीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.


ही नियुक्ती त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून 6 वर्षांसाठी किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८