मुंबई प्रतिनिधी चित्रलेखा रासने : नवरात्रौत्सवानिमित्त आपण जाणून घेत आहोत राज्यातील देवीच्या साडेतीन शक्ती पीठ कोणती आहेत ही देवीचा साडेतीन शक्ती पीठं ? त्यांच्या अख्यायिका काय ? घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी आपण साडेतीन शक्तीपीठांतील पहिल्या पीठाबद्दल म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मीबद्दल जाणून घेतलं त्यानंतर आज आपण देवीच्या दुसऱ्या शक्तीपीठाबद्दल जाणून घेणार आहोत.देवीचं दुसरं पुर्ण पीठ म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेल्या तुळजापूर या ठिकाणी तुळजाभवानीचं प्राचीन मंदीर आहे. या देवीला तुर्जा भवानी असंही म्हटलं जात. देवीचं हे मंदीर बालाघाटावरील एका डोंगरमाथ्यावर वसलेलं आहे. त्यामुळे जवळ गेलं तरी या मंदीराचा कळस दिसतं नाही. तर या मंदीराच्या काही भागांचं बांधकाम हेमाडपंथी पद्धतीने केलेलं आहे.
तर स्कंद पुराणातील सह्याद्री विभागात या देवीची अख्यायिका सांगितली जाते की कृतयुगात जेव्हा ऋषी कर्दमांची पत्नी अनुभूती ध्यान करत होती.तेव्हा कुकर या राक्षसाने तिला मारण्यााचा प्रयत्न केला. त्यावेळी अनुभूतीने या राक्षसापासून वाचण्यासाठी देवी भगवतीची प्रार्थना केली. देवी प्रगट झाली आणि त्या राक्षसाचा तिने वध केला. ही घटना घडली याच बालाघाटातील डोंगरावर तर अनुभूतीने देवीला येथेच राहण्याची विनंती केली. तेव्हापासून देवी याच ठिकाणी वसलेली असल्याचं सांगितलं जात.तसेच या मंदीराला दक्षिणबाजूला परमार दरवाजा आहे. या दरवाजाबद्दल सांगितलं जातं की तेथे आज्ञापत्र ठेवण्यात आलेलं असून त्यामध्ये म्हटलं आहे की जगदेव परमार या भक्ताने देवीची सातवेळा प्रार्थना केली होती. त्यामुळे या दरवाजाला त्याचे नाव देण्यात आलेले आहे.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याची तुळजाभवानी ही कुलदेवता आहे. तसेच महाजांना देवीने दृष्टांत देऊन तलवार दिली होती. त्यामुळेच त्यांच्या तलवारीला भवानी तलवार असं म्हटल जायचं. अशीही अख्यायिका सांगितली जाते. त्याचबरोबर तुळजाभवानीच्या नवरात्रौत्सवाची देखील खासियत आहे ती म्हणजे इतरत्र नवरात्रौत्सव नऊ दिवस चालतो. मात्र तुळजापूरात नवरात्रौत्सव २१ दिवस चालतो.