आदर्श नागरी पतसंस्था ठेवीदारांच्या ठेवी तातडीने देण्यासंदर्भात कार्यवाही करावी -सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श नागरी पतसंस्था व आदर्श महिला नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदार व गुंतवणुकदारांचा परतावा तातडीने देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले.छत्रपती संभाजी नगर येथील आदर्श नागरी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी परत मिळणेबाबत आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

  यावेळी मंत्री वळसे-पाटील बोलत होते. मदत व पूनर्वसन मंत्री अनिल पाटील सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार सहकार आयुक्त अनिल कवडे आदर्श नागरी पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे प्रमुख (SIT) तथा सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) धनंजय पाटील व इतर सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

  मंत्री वळसे-पाटील म्हणाले की आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या ठेवी परत मिळणेबाबत सर्व संबंधितांनी तातडीने आवश्यक ती कायर्वाही विहीत वेळेत पुर्ण करावी तसेच आदर्श नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या ठेवी परत देण्याकरिता स्थापन केलेल्या विशेष तपास पथक प्रमुख (SIT) तथा सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) धनंजय पाटील यांनी कार्यवाहीबाबतचा अहवाल संबंधितांना तातडीने सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८