नवी दिल्ली प्रतिनिधी : महाराष्ट्र सदन येथे आज दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. या यानिमित्त भ्रष्टाचारविरूद्ध लढा देण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.राज्यात दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात येतो. यावर्षी 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी भ्रष्टाचाराला नाही म्हणा राष्ट्रासाठी वचनबद्ध व्हा ही संकल्पना घेऊन हा सप्ताह साजरा केला जाणार आहे.
याअंतर्गत कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचारविरूद्ध लढा देण्याची..प्रतिज्ञा दिली.सोबतच दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त राज्यपाल व मुख्यमंत्री महोदयांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले.याप्रसंगी सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावार स्मिता शेलार महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक (प्र.) अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.