शिवशक्ती क्रीडा मंडळाचा नवरात्र उत्सव उत्साहात साजरा...

ल्याण प्रतिनिधी चित्रलेखा रासने : कल्याण येथील जोशीबाग येथे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण उत्सव मोठया उत्साहात आनंदात साजरे केले जातात. त्यापैकीच नवरात्र हा देवीचा उत्सव भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होतो.अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्रोत्सवाला सुरुवात होते.

  नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते.त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील कल्याण पश्चिम जोशीबाग येथील शिवशक्ती क्रीडा मंडळाचे ४० वे वर्ष असून त्यांनी देखील देवीची स्थापना केली.मंडळाचे अध्यक्ष वेदांत शिंदे उपाध्यक्ष राज टिटकारे सत्यम चौरसिया व समस्त शिवशक्ती क्रिडा मंडळाचे सर्व सदस्यांनी अतिशय भक्तिभावाने १५  ते २४ ऑक्टोबर २०२३ यादरम्यान उत्स्फूर्तपणे उत्साह साजरा केला.तरुण मंडळी पासून ते अगदी जेष्ठ नागरिक यांनी देखील देवीचा जागर मनापासून केला.देवीच्या मंडपाची आरास तर खूपच छान होती.

  विविध सांस्कृतिक कार्यक्रम भजन होमहवन हरिपाठ कीर्तन रात्री गरबा व दांडिया यांचे देखील आयोजन उत्तम करण्यात आले होते.या सर्वांत जेव्हा तरूणाई पुढे येऊन सहभागी होते तेव्हा मनाला खूपच दिलासा मिळतो. येणारी पुढची पिढी आपल्या संस्कृती परंपरा यांचा वारसा पुढे कायम जपणार अखंडपणे चालू ठेवणार यात काही शंकांचं नाही असे नेहमीच वाटते.अश्या पध्दतीने नवरात्र उत्सवाची सांगता मनोभावे करून विसर्जन करण्यात आले.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८