कल्याण प्रतिनिधी चित्रलेखा रासने : दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक म्हणून या सणाला ओळखले जाते.कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा वेचक मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या अनुबंध संस्थेतर्फे एक हात मदतीचा हा चांगला माणुसकी जपणारा हेतू डोळ्यासमोर ठेवून 09 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिवाळी स्टॉल लावण्यात आला होता.विमानतळ व्यवस्थपणाच्या सहकार्याने लावण्यात आलेल्या स्टॉलवर कचरावेचक मुलांनी बनवलेली उत्पादन विक्री साठी उपलब्ध करून देण्यात आली होती.
डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा वेचक मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेली दहा वर्षे अनुबंध ही स्वयंप्रेरीत मुलांसाठी काम करणारी संस्था विविध स्थरावर काम करत आहे.ह्या दिवाळी विशेष उपक्रमात पणत्या सुगंधित उटणे,फळांची साबणे कापडी व कागदी बॅग ही उत्पादने विक्री साठी ठेवण्यात आले होते.
याला बिव्हीजी फॅसिलिटी टीमने अतिशय उत्तम चांगला प्रतिसाद दिला.खऱ्या अर्थाने चेहऱ्यावरील आनंद शब्दांत व्यक्त करता येत नव्हता.यामध्ये अनुबंध संस्थेच्या सूर्यकांत कोळी विशाल कुंटे प्रभाकर घुले आणि शिला घुले हे कार्यकर्ते सहभागी झाले होते.