अनुशेषाची पदे तात्काळ भरण्याच राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची सूचना

मुंबई प्रतिनिधी : राज्याच्या अनुसूचित जाती आयोगाने मुंबई दौऱ्यामध्ये राज्य शासनाच्या संस्था राष्ट्रीयकृत बँका आणि विमा कंपन्या यांच्या समवेत आढावा बैठका घतेल्या.सर्व अनुशेषाची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत अशा सूचना या बैठकांमध्ये केल्याचे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदर यांनी सांगितले.

  या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत माहिती देण्यासाठी हलदर यांनी मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी आयोगाचे सदस्य सुभाष पारधी अंजू बाला उपस्थित होते.हलदर म्हणाले अनुसूचित जाती कर्मचाऱ्यांचे आरक्षण रोस्टर अद्ययावत ठेवावे.अनुसूचित जाती उमेदवारांना भरती पूर्व आणि पदोन्नती पूर्व प्रशिक्षण दिले जावे.प्रत्येक संस्थेने एससी सेलची स्थापना करावी तक्रार निवारण यंत्रणा अंमलात आणावी अशा शिफारसी देखील आयोगाने केल्याचे त्यांनी सांगितले.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८