महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी १४ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई प्रतिनिधी : मुंबई उपनगर जिल्ह्यातील वीरशैव-लिंगायत समाजातील इच्छुक व्यक्ती व त्या समाजाच्या उत्थानासाठी काम करीत असलेल्या संस्थांना देण्यात येणाऱ्या महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारसाठी १४ मार्च २०२४ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

  सन २०२३-२४ या वर्षाकरिता पात्रतेचे निकष व अटींची पूर्तता करीत असलेल्या वीरशैव-लिंगायत समाजातील इच्छुक व्यक्ती व  संस्थांनी अर्ज करावेत. पात्रतेचे निकष व अटींची पूर्तता करीत असलेले अर्ज सहायक संचालक इतर मागास व बहुजन कल्याण विभाग मुंबई उपनगर कार्यालय ४ था मजला नवीन प्रशासकीय इमारत आर.सी.मार्ग चेंबूर (पू.) मुंबई-४०००७१ या पत्त्यावर १४ मार्च २०२४ पर्यंत सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० पर्यंत करावेत.तद्नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत असे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.अधिक माहितीसाठी 022-25222023 या क्रमांकावर संपर्क साधावा.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८