भिवंडी-लोकसभा निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून चित्तरंजन धंगडा यांच्याकडे जबाबदारीसा.सप्तरंग न्युजरूम साक्षी कुशवाह : २३-भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी चित्तरंजन धंगडा माझी (IRS) यांची निवडणूक खर्च निरिक्षक म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत ‍निवडणूक आयेगाने त्यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे.चित्तरंजन धंगडा माझी हे भारतीय महसूल सेवेतील २०१० च्या बॅचचे अधिकारी आहेत.त्यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभासंघाकरिता कामकाज सोपविण्यात आले आहे.

खर्च निरीक्षकांना भेटण्याची वेळ

  २३-भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरिक्षक चित्तरंजन धंगडा माझी यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय उप विभागीय कार्यालय भिवंडी येथे भेटण्याची वेळ दुपारी ४ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. त्यांचे मतदारसंघातील संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे आहे.केंद्रीय खर्च निरीक्षक चित्तरंजन धंगडा माझी (आयआरएस) यांचा संपर्क क्रमांक-८३६९७३६०८२ असा असून 23.bhiwandiexpobs@gmail.com हा त्यांचा इमेल पत्ता आहे.

निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून खर्च निरीक्षक नकुल अग्रवाल

२४-कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी नकुल अग्रवाल (IRS) यांची निवडणूक खर्च निरिक्षक म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत ‍निवडणूक आयेगाने त्यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे.नकुल अग्रवाल हे भारतीय महसूल सेवेतील २०११ च्या बॅचचे अधिकारी आहेत.त्यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभासंघाकरिता कामकाज सोपविण्यात आले आहे.

र्च निरीक्षकांना भेटण्याची वे

  २४ कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरिक्षक नकुल अग्रवाल यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय कल्याण डोंबिवली महानगरपालिका जलतरण तलाव कार्यालय वै.ह.भ.प सावळाराम महाराज म्हात्रे  क्रिडासंकुल पेंढारकर  कॉलेजजवळ घारडा सर्कल डोंबिवली पूर्व ता. कल्याण  येथे भेटण्याची वेळ दुपारी ४ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. त्यांचे मतदारसंघातील संपर्क क्रमक खालीलप्रमाणे आहे.केंद्रीय खर्च निरीक्षक नकुल अग्रवाल (आयआरएस)यांचा संपर्क क्रमांक  ८३६९७५१६५४ असा असून Expobs24kalyan@gmail.com हा त्यांचा इमेल पत्ता आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८