मुंबई प्रतिनिधी पुनित खांडेकर : ११ ऑगस्ट २०२४ कुणबी समजोन्नती संघ मुंबई या संघटनेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली असून सदर निवडणुकीला आजी माजी पदाधिकारी शाखा प्रतिनिधी उपस्थित होते.
या निवडणुकीसाठी गुहाघरचे कृष्णा वणे आणि माणगावचे अनिल नवगणे इच्छुक असून १० मतांची मात करीत अनिल नवगणे विजयी झाले.२०२४ ते २०२८ च्या अध्यक्ष पदी अनिल नवघणे बहुमताने निवडून आले असून उपाध्यक्ष पदी उदय कटे माणगाव शंकर म्हसकर रोहा बबन उंडरे अवधूत तोरस्कर राजापूर यांची निवड झाली.त्याच प्रमाणे सरचिटणीस पदी गुहाघरचे कृष्णा वणे यांची निवड करण्यात आली व सहचिटणीस पदी रवींद्र कुर्तडकर रत्नागिरी माधव कांबळे गुहागर प्रमोद खेराडे दापोली व संजय उमासरे महाड यांची निवड झाली.तर खजिनदार पदी महेश शिर्के म्हसळा यांची निवड करण्यात आली.सदर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या.