उपायुक्त अवधूत तावडे व सहाय्यक आयुक्त प्रशांत ठाकूर या अधिकाऱ्यांना कधीही अटक होऊ शकते.?

ल्याण प्रतिनिधी विनायकव्हाण : कल्याण डोंबिवली महापालिकेला भ्रष्टाचाराचं कुरण संबोधलं जातं. त्यामुळेच आतापर्यंत या महापालिकेत लिपीकापासून ते अगदी उपायुक्तापर्यंत-एकूण-४६ अनेकांना प्रतिबंधक विभागाने रंगेहात लाच घेताना पकडण्यात आलेले आहे.तशीच एक घटना महापालिकेच्या मुख्यालयामध्ये समोर आलेली आहे मटण विक्री दुकानाचा परवाना हस्तांतरण करण्याच्या बदल्यात-दिड.लाख रुपयांची लाच घेताना महापालिकेचा लिपीक प्रशांत धीवर याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे आहात अटक केलेली आहे.या अटकेनंतर लिपिक प्रशांत धीवर याने यात आणखी महापालिकेचे दोन बडे अधिकारी असल्याचा धक्कादायक खुलासा केलेला आहे.

   प्रशांत धीवर हा महापालिकेत लिपीक यापदावर आहे त्याला दीड लाखाची लाच घेताना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महापालिकेच्या मुख्यालयामध्ये रंगेहाथ पकडले आहे.हे पैसे आपण स्वत:साठी नाही तर महापालिका मुख्यालयामधील प्रशासनाच्या वतीने आलेले अनधिकृत बांधकाम उपायुक्त अवधूत तावडे  व सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्यासाठी घेत होतो  असा धक्कादायक खुलासा प्रशांत धीवर याने तपासा दरम्यान केलेला आहे.त्यामुळे-महापालिकेचे प्रशासकीय अनाधिकृत उपायुक्त अवधूत तावडे व सहाय्यक आयुक्त प्रशांत ठाकूर या दोन्ही अधिकाऱ्यांना कधीही अटक होऊ शकते.

   प्रशांत धीवर याला मा.कल्याण कोर्टाने-०३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान त्याच्या घरात मोठ्या प्रमाणात दागिने व रोकड सापडल्याची माहिती देखील समोर आलेली आहे.कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयात ३१ जानेवारी २०२५ सायंकाळी ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धाड टाकली होती या प्रकरणात महापालिकेचा बाजार परवाना विभागाचा लिपीक प्रशांत धीवर याला दीड लाख रुपये घेताना रंगेहाथ अटक करण्यात आलेली आहे धीवर याने कल्याणमधील एका मटण विक्री दुकानाचा परवाना हस्तांतर करण्यासाठी दोन लाखाची मागणी केली होती.तड-जोड होऊन दीड लाख रुपयांवर व्यवहार ठरला.तेच पैसे घेताना त्याला अटक करण्यात आली आहे.

   त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक त्याला घरी घेऊन गेले. त्याच्या घरात देखील काही प्रमाणात दागिने व रोकड सापडल्याची माहिती समोर आली आहे.प्रशांत धीवर याने अटकेनंतर खुलासा केला आहे की,त्याने हे पैसे स्वत: साठी नाही तर शासनाकडून आलेले महापालिकेमधील उपायुक्त अवधूत तावडे व सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्यासाठी मागितले होते असा खुलासा केलेला आहे.त्यांच्या आदेशावरुन हे काम करत होतो.धीवर याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मा.कल्याण जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश आर.जी.वाघमारे यांच्यासमोर हजर केले असता मा.न्यायालयाने त्याला ०३-फेब्रुवारी-२०२५

र्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

   कल्याण डोंबिवली महापालिका ही भ्रष्टाचारासाठी ओळखळी जाते यापूर्वी मालमत्ता विभागाचे तत्कालीन उपायु्कत सुरेश पवार यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पालिकेच्या  बहुचर्चित तत्कालीन अभियंता सुनिल जोशी याला-०५-लाखाची लाच घेताना अटक करण्यात आली होती.सुनिल जोशी याचे लाच प्रकरण अनेक दिवस संपूर्ण जगभर गाजले होते.त्याच्या बेहिशोबी मालमत्तेचा हिशोब करताना अधिकारी थक्क झाले होते.त्यानंतर तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजय घरत याला बेकायदा बांधकाम प्रकरणी महापालिकेच्या मुख्यालयाच्या कार्यालयामध्ये-०८.लाख रुपयांची लाच घेताना अटक केली होती.त्याच्या लाचेचे प्रकरणही खूप गाजले होते.या बड्या अधिकाऱ्यांपैकी सुरेश पवार सुनिल जोशी यांना पुन्हा महापालिकेच्या मुख्यालयामध्ये कामावर रुजू करून घेण्यात आलेले होते.त्यांची सेवा पूर्ण झाल्यावर ते सेवानिवृत्त झाले.मात्र अतिरिक्त आयुक्त घरत याने पुन्हा महापालिके येण्याचा प्रयत्न केला.त्याला राजकीय वरदहस्तही होता मात्र त्याला काही पुन्हा महापालिकेत प्रवेश करता आला नाही.निलंबन काळात घरत सेवानिवृत्त झाला आत्तापर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या-४६ कर्मचारी अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८