खरंच घटस्फोट म्हणजे स्वातंत्र्य आहे का?

 

संपादकीय,

  घटस्फोट मुलांना तोडतो.आपण नेहमी म्हणतो-घटस्फोट म्हणजे स्वातंत्र्य पण खरं सांगायचं तर तो एक वादळ असतो.तो पती-पत्नीमध्ये होतो.पण धक्के सहन करावी लागतात मुलांना त्यांचं जग अचानक दोन तुकड्यांत विभागलं जातं. आणि एकदा घराचं छप्पर तुटलं की त्याखाली उभं राहणं कुणासाठीही सोपं राहत नाही.घटस्फोट म्हणजे मुलांच्या सुरक्षिततेवर घाव. आई-बाबांचे मतभेद तेवढे त्यांच्या मनात साठवले जातात.मोठ्यांसारखं बोलून व्यक्त करण्याची ताकद नसते पण आतून मात्र जखम होत राहते.

   वडील म्हणून नव्हे—तर जबाबदारी म्हणून पाहिलं जातं कायदा म्हणतो, दोघंही समान पण बऱ्याचदा वडील हा माणूस म्हणून दिसतच नाही.तो फक्त बँक अकाऊंट म्हणून दिसतो. मुलांना चैनीची नव्हे—तर स्थैर्याची आस असते.त्यांना महागड्या वस्तू नकोत.त्यांना फक्त हवं असतं. आई-बाबा दोघंही एकत्र असलेलं घर.आनंद तात्पुरता असतो—बांधिलकी कायमची आज आपण ऐकतो. तुला अजून चांगलं मिळेल.पण खरं सुख बांधिलकीत असतं नातं जपण्यात असतं.कारण आनंद क्षणिक असतो पण पश्चात्ताप कायमचा.

   मुलं विसरत नाहीत ते मोठे झाल्यावरही लक्षात ठेवतात.कोण राहिलं आणि कोण सोडून गेलं.कोण लढलं आणि कोणी हात टेकले.घटस्फोट फक्त पती-पत्नीमध्ये होत नाही.तो मुलांच्या भविष्याशी होतो.घर कोसळलं तर ढिगाऱ्याखाली त्यांचंच बालपण गाडलं जातं.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८