चार दिवसांमध्ये ६२ हजार ९१६ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री 

चार दिवसांमध्ये ६२ हजार ९१६ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री 


- राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप  यांची माहीती



 


मुंबई प्रतिनिधी :  राज्यात १५ मे २०२० पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत गेल्या चार दिवसात ६२ हजार ९१६ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात  असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.


      १५ मे २०२० रोजी ५४३४ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यास आली. तर १६ मे २०२० रोजी ८२६८ ग्राहकांना, १७ मे २०२० रोजी २०४८५ ग्राहकांना आणि १८ मे २०२० रोजी २८७२९  ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यास आली.


        मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण १०७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी ५२२१ अनुज्ञप्ती सुरू आहेत.  राज्यात दि.१५ मे 2020 पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्य विक्री सेवा देण्यात येत आहे. मद्य सेवन परवाने राज्य उत्पादन शुल्काच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. तथापी IOS प्रणलीबाबत संकेत स्थळावर अडचणी होत असल्याचे निर्देशनास आले आहे. या प्रणालीतील अडचणी दुर करण्यात येत आहेत तो पर्यन्त मद्यसेवन परवाना घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींच्या निर्देशनास आणण्यात येते की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व निरीक्षक/दुय्यम निरीक्षक कार्यालये व अधीक्षकांच्या कार्यालयात दरोराज मद्य सेवन परवाने  Offline पध्दतीने देण्याची सोय करण्यात आली आहे. सदर मद्य सेवन परवाने एक वर्षाकरीता रु.१००/- किंवा आजीवन परवान्याकरीता रु.१०००/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकताता. तरी मद्य विक्री दुकानासमोर गर्दी न करता मद्य सेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घेता येणार आहे.


एकूण १०७९१  किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी  ५१८९ अनुज्ञप्ती सुरू


        मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण १०७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी ५१८९ अनुज्ञप्ती सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. राज्य शासनाने ३ मे, २०२० पासुन लॉकडाऊन कालावधीत सीलबंद  मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. सदर  मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राज्यातील ३३ जिल्ह्यात ( ३ कोरडे जिल्हे वगळता गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर ) काही जिल्हयांमध्ये सशर्त अनुज्ञप्ती सुरू आहे तर काही जिल्हयांमध्ये मद्य विक्री बंद आहे.


         किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सुरु असलेल्या जिल्हयांची नावे 


१. ठाणे, २. पालघर, ३. रायगड, ४. पुणे, ५. सोलापूर ६. अहमदनगर, ७. कोल्हापुर, ८. सांगली, ९. सातारा, १०. सिंधुदुर्ग, ११. रत्नागिरी, १२. नाशिक, १३. धुळे, १४. नंदुर


दिगंबर वाघ


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी राहा, सुरक्षित राहा 
प्रशासनाला सहकार्य करा...