सर्वात श्रेष्ठदान रक्तदान !! तर मग चला ३१ डिसेंबर कल्याण पूर्वेला...-नारायण पाटील सरचिटणीस
कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या रक्तानंद ग्रुपतर्फे मध्यरात्रीचे रक्तदान शिबिर व राज्यस्तरीय रक्तकर्ण पुरस्कार वितरण सोहळा केदार दिघे आनंद दिघे यांचे वंशज यांच्या हस्ते संपन्न होणार असून यासाठी कल्याण-डोंबिवली शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान संस्थेचे सरचिटणीस यांनी जाहीर आव्हान केले आहेत.
पाश्चिमात्य प्रथेला चपराक देण्यासाठी व युवकांसमोर एक नवीन आदर्श म्हणून धर्मवीर आनंद दिघे यांनी रक्तदानासारख्या राष्ट्रीय पवित्र व पुण्य कार्याने जाणाऱ्या वर्षाला निरोप व येणाऱ्या वर्षाचे स्वागत मध्यरात्री १२:०१ मिनिटांनी रक्तदानाने करण्याची प्रथा मागील २९ वर्षापासून सुरू आहे. सरत्या वर्षाला निरोप (थर्टी-फर्स्ट) अर्थातच ३१ डिसेंबर मुंबई सारख्या मायावी नगरीत मास डान्स व पार्टी यांनी साजरा करण्याची चढाओढ सुरू झाली आहे. या पाश्चिमात्य प्रथेला अनेक तरुण-तरुणी बळी पडत असून अनेकदा हाणामारी अपघात किंवा मादक पदार्थ प्राशन केल्याने मृत्यू व महिला अत्याचार सारखे भयानक प्रकार घडत आहेत.
नववर्षाच्या सुरुवातीलाच अशा भयानक घटनांमुळे कुटुंब समाज व मित्रमंडळी यांना दुर्दैवी प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. ही गोष्ट कोणत्याही तरुण-तरुणीसाठी हितावह नाही त्याऐवजी रक्तानंद ग्रुप महाराष्ट्र या संस्थेतर्फे मागील २८ वर्षापासून मध्यरात्री १२:०१ मिनिटांनी रक्तदानासारखे राष्ट्रीय पवित्र कार्य व २५ वेळा पेक्षा जास्त विक्रमी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास राज्यस्तरीय रक्तकर्ण पुरस्कार देऊन गौरविले जात आहे.अशा विक्रमी रक्तदात्यांनी आपण केलेल्या रक्तदानाच्या संपूर्ण पुरावा व माहितीसह शनिवार २० डिसेंबर पर्यंत आपले निवेदन संस्थेचे सरचिटणीस नारायण पाटील संपर्क- ९८१९४६१३६९ कोळसेवाडी कल्याण पूर्व येथे सादर करावे.
संपूर्ण महाराष्ट्रातून रक्तदाते युवक युवतींना आवाहन केले जात आहे की त्यांनी बुधवार ३१ डिसेंबर २०२५ रोजी कल्याण पूर्व येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रीडांगण राज्यश्री शाहू उद्यानासमोर कल्याण पूर्व येथे मध्यरात्री रक्तदानाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आव्हान रक्तनंद ग्रुपचे सरचिटणीस नारायण पाटील उपाध्यक्ष किरण निचळ व कार्याध्यक्ष भूपेंद्र अहिरे यांनी केले आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटक व कार्यक्रमाला उपस्थित असणारे धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्या शुभहस्ते होणार असून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवून रक्तदान करण्याचे आवाहन रक्तानंद ग्रुप महाराष्ट्र यांच्यातर्फे संस्थेचे पदाधिकारी शांताराम डिगे रवींद्र कडणे निरज कुमार दिनेश साळुंखे अशोक बोयतकर प्रसाद भंडारे आप्पा आतकरे प्रमोद गायकवाड विलास तुरकणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहतील राहणार आहेत.
