अंधेर नगरी चौपट प्रजा

      "अंधेर नगरी चौपट प्रजा"



 ठाणे प्रतिनिधी- मिलिंद महाडीक


            अंधेर नगरी चौपट राजा म्हणण्या ऐवजी चौपट प्रजा बोलायची वेळ आली आहे, तेही मुंबई शहरातील अंधेरी उपनगरात. संपूर्ण जगभरात कोराना विषाणूच्या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असताना भारतात महाराष्ट्रात मुंबई बरेसशा प्रमाणात रुग्ण आढळले आहेत. सर्वञ सोशल डिस्टेंस्टींग नियम आणि जनता कर्फ्यू आहे. तरी सरार्सपणे नियम मोडून जनता(प्रजा) फिरत आहे. त्यांना आजाराचे अजून सुद्धा गांभिर्य नाही. अंधेरी पश्चिम डी.एन.नगर सितलादेवी चाळ येथे रहिवाशी भागामध्ये भाजीपाला, मांस मटण दुकान बंदी असताना सुद्धा चिकण सेंटर सुरु आहे. येथील काही लोक रस्त्यावर उभे राहून बिना मास्क लावून भटकणे, इकडे तिकडे थूंकने, सोशल डिस्टिंशिग नियम धुडकावून भाजी विक्री व चिकण विक्री सुरु आहे. बृहन्मुंबई महापालिका "के" वार्ड विभागाला यासंबधी फोनवर तक्रार केली, अजून कोणीही दखल घेतली नाही. संबधित स्थानिक प्रशासनाने लवकरच याची दखल घेऊन कारवाई करावी, ही येथील रहिवाशांनी मागणी केली आहे.  जनतेच्या आरोग्याची काळजी  घ्यावी. आतापर्यंत मुंबईत २२००० अधिक कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत व मृतांचा आकडा ८०० वर गेला आहे. कर्तव्य पार पडणारे प्रशासन, डॉक्टर, परिचारीका, आरोग्य कर्मचारी, शासनयंञणा, पोलिस यंञणा, सामाजिक संस्था यांची खूप मदत केली आहे.


दिगंबर वाघ


         कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


          घरी राहा, सुरक्षित राहा 
          प्रशासनाला सहकार्य करा...