द्वितीय अपील, तक्रारी दाखल करण्याबाबत आवाहन
तातडीच्या द्वितीय अपील, तक्रारी दाखल करण्याबाबत अर्जदारांना आवाहन
मुंबई प्रतिनिधी : कोविड-१९ विषाणूच्या संसर्गामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अर्जदारास जिवित वा स्वातंत्रसंदर्भात अर्ज दाखल करावयाचा असल्यास, त्यासंदर्भात राज्य माहिती आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘महत्त्वाची पत्र’ या सदरात दि.२१.०५.२०२० रोजीच्या सूचनेन्वये करावयाची प्रक्रिया प्रकाशित करण्यात आली आहे.
ज्या अर्जदारांना तातडीच्या द्वितीय अपील / तक्रारी दाखल करावयाच्या असतील त्यांनी दि.२१.०५.२०२० च्या सूचनेतील प्रक्रियेचा अवलंब करावा, असे आवाहन राज्य माहिती आयोग यांच्यावतीने करण्यात आले आहे
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी राहा, सुरक्षित राहा
प्रशासनाला सहकार्य करा...