बारा वर्षाच्या नोकरीत नऊ वेळा बदली झालेला अधिकारी

बारा वर्षाच्या नोकरीत नऊ वेळा बदली झालेला अधिकारी


कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांच्या बारा वर्षात नऊ वेळा बदली करून ते जोमाने काम करित आहेत.
1) बारा वर्षाच्या नोकरीत नऊ वेळा बदली झालेला अधिकारी… बीड सारख्या दुष्काळी जिल्ह्यात ताडसौन्ना या गावी गरीब शेतकरी कुटुंबात तूकाराम मुंडेचा जन्म झाला.2) लहानपणी ते वडीलासोबत आठवडी बाजारात भाजी विकण्यास जात.जिल्हा परिषद शाळेत शिकल्यानंतर अकरावी-बारावीला विज्ञान शाखेत त्यांनी प्रवेश घेतला.3) औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयातून इतिहास, राज्यशास्ञ विषयात पदवी प्राप्त केली.4) त्यांनी 1997,99 साली MPSC चे दोन प्रयत्न दिले पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत, 2001 साली दिलेल्या परिक्षेत त्यांना अर्थ खात्यात क्लास टू चे पद भेटले..5) शासकिय सेवेत रूजू होण्यासाठी तब्बल तिन वर्षाचा कालावधी त्यांना लागला, या कालावधीत त्यांनी जळगाव, मुंबई येथे शिक्षक म्हणून नोकरी केली.6) 2004 साली ते सेवेत रूजू झाले, त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन UPSCची तयारी करायचे ठरवले.7) 2005 साली UPSC चा निकाल लागला त्यात ते देशात 20 वे आले होते..8) त्यांची सेवेची सुरवात सोलापूरातून झाली, नंतर त्यांची बदली धरणी या आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून झाली तिथून त्यांची बदली नांदेडला उपजिल्हाधिकारी म्हणून झाली. अशा एकूण नऊ वेळा त्यांच्या बदल्या झाल्या.9) 2008 साली नागपूर जिल्हा परिषदेवर जेव्हा त्यांची CEO म्हणून निवड झाली. पहील्याच दिवशी त्यांनी काही शाळांना भेट दिली. त्यात त्यांना असे दिसून आले की शिक्षक गैरहजर आहेत. ते विनापरवाना अधिवेशन पहायला गेले होते. दूसर्या दिवशी त्या शिक्षकांचे निलंबन त्यांनी केले. तेव्हापासून 10-12% शिक्षकाचे गैरहजरीचे असणारे प्रमाण हे 1-2% वर आले..10) वैद्यकीय कारभारातील अनियमितता पाहून त्यांनी काही डाॅक्टरला निलंबित केले. इतिहासात पहील्यांदाच असे झाले की एका CEOने डाॅक्टरला निलंबित केले..11) मार्च 2009 ला नागपूरला असताना त्यांनी लग्न केले, सार्वजनिक आयुष्यात कधी वैयक्तिक आयुष्याचा बाधा त्यांनी येऊ दिला नाही.12) 2009 सालीच नागपूरवरून त्यांची बदली नाशिकला ‘अतिरिक्त आदिवासी आयुक्त’ पदावर करण्यात आली, हे पद त्यांच्यासाठीच तयार केले. या काळात त्यांच्या पत्नी गर्भवती होत्या. परिवार पुण्यात राहायचा आणि ते नाशिकच्या विश्रामगृहात, हा काळ त्यांच्यासाठी कठीण होता. हे पद नाॅन केडर आहे. मी या पदावर जास्त काळ राहू शकत नाही असे पञ त्यांनी शासनाला लिहले. यावर त्यांची बदली वाशिमला CEO म्हणून झाली. वाशिमला दहा महीने त्यांनी काम केले13) मे 2010 ला मुंबईला KVIC ला CEO म्हणून बदली झाली. नंतर त्यांची जालन्याला कलेक्टर म्हणून बदली झाली. जायकवाडीवरून जालन्याला पाणी आणण्याचे काम सहा वर्षापासून रखडले होते त्यांनी अगदी तीन महीन्यात ते करून दाखवून जालनाकरांची तहान भागवली..14) 2011-12 साली त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर पद सांभाळले. सप्टेंबर 2012 साली त्याची बदली मुंबई, विक्री व कर विभागाच्या सह आयुक्त पदी निवड झाली. 143 कोटी रूपयांचा महसूल 500 कोटीवर त्यांच्या काळात गेला. त्यांच्या धडाकेबाज कामकाजाने काही जणांना अडचणी येऊ लागल्या. त्यांची तेथून परत सोलापूरला जिल्हाधिकारी म्हणून बदली केली.15) नुकतीच शासनाने जलयुक्त शिवार योजना आणली होती, यामध्ये त्यांनी सोलापूरातील 282 गाव घेतले.150 कोटी रूपयांमध्ये काम केले यातील लोकांचे योगदान 50-60 कोटींचे होते. वर्षाला 400 टॅकर लागणार्‍या सोलापूरात टॅकरची संख्या 30-40 वर आली.16) पंढरपूर मंदिर समितीच्या चेअरमनपदी असताना अवघ्या 21 दिवसात आषाढी वारीच्या वारकर्यासाठी 3 हजार शौचालयाची व्यवस्था त्यांनी केली. त्यांनी CM सोडता इतर VIP दर्शन पण बंद केले. तब्बल 18 महीने सोलापूरात राहील्यावर त्यांची बदली नवी मुंबई मनपा आयुक्त पदी झाली.17) याकाळात अतिरिक्त बांधकामवर उगारलेल्या हतोड्यामुळे सर्वपक्षीय नेते त्यांच्या बदलीसाठी एकञ आले. ‘आयुक्तासोबत चाला’ हा सकाळी walking चा कार्यक्रम जनतेत गाजला. त्यांची बदली न होण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली.18) नुकतीच त्यांची पुणे महानगरपालिकेच्या PMPML च्या अध्यक्षपदाची सुञे हातात घेतली.गैरहजर राहून वेठीस धरनार्याना चाप लावली. महीन्याला 6 लाख लोकांची असणारी ग्राहकसंख्या 9 लाखांवर गेली. तब्बल 12 वर्षाच्या काळात त्यांची 9 वेळा बदली झालीअशा या कर्तव्यदक्ष अधिकार्यास आमचा मानाचा मुजरा 


      दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक- ९४०४४५३५८८


 


      घरी राहा, सुरक्षित राहा 
      प्रशासनाला सहकार्य करा...