वैद्यकीय परीक्षांबाबतची अनिश्चितता दूर करा
वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे आरोग्य विज्ञान
विद्यापीठाच्या कुलगुरूंना दूरध्वनीवरील चर्चेत निर्देश
मुंबई प्रतिनिधी- राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत सध्याच्या परिस्थितीत संभ्रम निर्माण झाला आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन ही अनिश्चितता दूर करावी असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिलीप म्हैसेकर यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या संभाषणात त्यांना दिले आहेत.
नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येतात. यामध्ये मेडिकल, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी त्याचप्रमाणे नर्सिंग परीक्षांचा समावेश आहे. मात्र सध्याच्या लॉकडाऊन च्या परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि पालक यांना परीक्षांबाबत आरोग्य विज्ञान विद्यापीठ काय निर्णय घेणार याबद्दल कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे त्यामुळे विद्यापीठाने स्पष्ट भूमिका घेऊन याबाबतची अनिश्चितता तातडीने दूर करावी अशी
अपेक्षाही वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत चा निर्णय राष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या केंद्रीय परिषदांवर अवलंबून असतो हे खरे असले तरीही या संस्थांशी तातडीने विचारविनिमय करून परीक्षांबाबतची भूमिका स्पष्ट करावी अशासूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिल्या आहेत.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी राहा, सुरक्षित राहा
प्रशासनाला सहकार्य करा...