कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत पुन्हा लाॅकडाऊन !!
--आयुक्त विजय सुर्यवंशी
कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण
कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांची खात्री झाली आहे की, कोविड-१९ विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये लॉकडाऊन करणे गरजेचे आहे आणि यापूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेने महारोगराई। (साथीचा रोग) (सर्व देशभर किंवा खंडभर) असलेला म्हणून घोषित केलेला आहे. आणि म्हणूनच त्याचा प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यापासून बचाव करण्यासाठी पुढील काही आपत्कालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याअर्थी, साथरोग अधिनियम १९८७ च्या कलम २ अन्वये, तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ च्या सर्व संबधित तरतुदींसह प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करुन, मी डॉ.विजय सूर्यवंशी, आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, क.डो.म.पा. हद्दीत दि.०२/०७/२०२० रोजी सकाळी ७.०० ते दि. १२/०७/२०२० सकाळी ७.०० वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करत आहे. तसेच सर्व हॉटस्पॉटमध्ये अत्यंत प्रभावीपणे लॉकडाऊनची अमंलबजावणी केली जाईल. या कालावधीत खालील नियम व उपाययोजना अंमलबजावणी केली जाईल.
१) अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तुच्या ने-आण करण्याशिवाय इतर सर्व कारणांकरिता कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत लॉकडाऊन लागू असेल.
२) इंटरसिटी, एमएसआरटीसी बसेस आणि मेट्रोसह सर्व सार्वजनिक परिवहन सेवांना परवानगी दिली जाणार नाही. टॅक्सी, ऑटोरिक्क्षा यांना परवानगी नाही. तथापि, आपत्कालिन वैद्यकीय सेवा घेण्यासाठी/देण्यासाठी प्रवाशांच्या वाहतुकीस परवानगी असेल. या ऑर्डर अंतर्गत ड्रायव्हर शिवाय केवळ एका प्रवाशासह खाजगी वाहनांना, परवानगी असलेल्या जीवनावश्यक वस्तु, आरोगय सेवा आणि या ऑर्डर अंतर्गत मान्य कृतींकरिता परवानगी असेल.
३) सर्व आंतरराज्यीय बस आणि प्रवासी वाहतुक सेवांचे (खाजगी वाहनांसह) तसेच खाजगी ऑपरेटरांकडून कामकाज बंद असेल तथापि बाहेरुन येऊन, बाहेर जाणाऱ्या टुरिस्ट वाहनांना परवानगी असेल.
४) ज्या प्रत्येक व्यक्तीला घरात वेगळे ठेवणे आवश्यक आहे त्यांनी त्याचे सक्त पालन केले पाहिजे. नाहीतर ती/ती कठोर दंडात्मक कारवाईसाठी जबाबदार असेल आणि तिला/त्याला महापालिकेच्या क्वॉरंटाईन सेंटर मध्ये सीलांतरित केले जाईल.
५) सर्व रहिवासी घरीच राहतील आणि सामाजिक परवानगीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन, वरील परिच्छेद २ मध्ये नमूद केलेल्या अटींचे पालन करुन, केवळ परवानगी असलेल्या कामासाठीच बाहेर येतील.
६) सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक बाबींच्या खरेदीसाठी ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध आहे.
७) व्यावसायिक आस्थापना कार्यालये आणि कारखाने, कार्यशाळा. गोदाम इ.सह सर्व दुकाने त्यांचे कामकाज बंद ठेवतील. तथापि, सतत प्रक्रिया आणि फार्मास्युटिकल्स इ. आवश्यक असलेल्या उत्पादन आणि उत्पादक युनिट्सना परवानगी असेल. पुढे डाळ व तांदुळ गिरणी, खाद्य व संबंधित उद्योग, दुग्धशाळा, खाद्य व चारा इत्यादींच्या आवश्यक वस्तुंच्या उत्पादनात गुंतलेली मॅन्युफॅक्चरिंग यूनिट्स चालविण्यास परवानगी असेल.
८) सरकारी कार्यालये या कालावधीत कमीतकमी कर्मचाऱ्यांसह ऑपरेट करण्याची परवानगी असेल आणि ते चेक काऊंटरजवळ एकमेकांपासून ३ फुट अंतर ठेवणे अशा सामाजिक अंतराची खात्री करण्यासाठी पावले उचलतील. ते त्यांच्या आवारात योग्य स्वच्छता आणि (हात) सॅनिटायझर्स / हात धुण्याच्या सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करतील.
९) आवश्यक वस्तु आणि सेवा प्रदान करणाऱ्या खालील दुकाने/आस्थापनांना वरील प्रतिबंधामधून वगळण्यात येत आहे.
a) जीवनावश्यक वस्तूची दुकाने, दुध, दुग्धजन्य दुकाने (डेअरी), बेकरी, किराणा दुकाने, भाजीपाला इत्यादी खादयपदार्थ आस्थापना सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजे पर्यंत सुरू राहतील. सदर सर्व दुकांनानी त्यांचे दुकानातुन कॉऊटर वरून वस्तूची विक्री न करता घरपोच सेवेव्दारे मालाची विक्री करावी. तथापि “मेडीकल स्टोअर्स, रूग्णालये/क्लिनीक/एलपीजी गॅस सिलेंडर / उद्वाहन दुरुस्ती (LIFT) ही दुकाने सुरू ठेवण्यासाठी उक्त मर्यादा लागु असणार नाही.
b) दूध विकीची दूकाने ही सकाळी ५.०० ते १०.०० या कालावधीत सुरू ठेऊन विक्री करता येईल.
C) संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकारी व प्रतिबंधीत क्षेत्रासाठी गठीत करण्यात आलेल्या करोना समितीने जिवनावश्यक वस्तु व भाजीपाला घरपोच पुरविणेकामी आवश्यक्ते नियोजन करुन सदर वस्तु नागरीकांना घरपोच सेवेव्दारे उपलब्ध होतील याबाबत कार्यवाही करावी.
d) बँका/एटीएम्स/विमा/ आणि संबधित बाबी.
e) प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे.
f) आयटी आणि आटीईएस, टेलिकॉम, टपाल, इंटरनेट आणि डेटा सेवांसह. g) पुरवठा साखळी व जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक व उपलब्धता.
h) कृषी वस्तु आणि उत्पदने आणि सर्व वस्तूंची निर्यात आणि आयात.
i) अन्न, फार्मास्युटिकल्स आणि वैद्यकीय उपकरणे यासह अवश्यक वस्तूंचे ई कॉमर्स (वितरण).
j) पाळीव प्राण्यांसाठी बेकरी आणि पशूवैद्यकीय आस्थापने.
k) फार्मास्युटिकल्स मॅन्युफॅक्चरिंग्ज आणि त्यांचे व्यापारी आणि त्यांची वाहतूक.
l) पेट्रोल पंप, एलपीजी, गॅस, तेल एजन्सी, त्यांची गोदामे आणि त्यांची संबधित वाहतूक कार्यो केवळ अत्यावश्यक सेवेतील पास धारकांसाठी.
m) खाजगी आस्थापना, ज्या आवश्यक सेवांच्या सहाय्यकारी सेवा किंवा कोविड-१९ च्या नियंत्रणासाठी सहाय्य करणाऱ्या सेवा..
n) वरील संबधित पुरवठा साखळी.
0) सर्व सुरक्षा आणि सुविधा व्यवस्थापन सेवा (ज्यात खाजगी एजन्सीव्दारे) आवश्यक सेवा पुरविणाऱ्या संस्थांना पुविल्या जातात.
p) मद्यविक्रीची दुकाने केवळ होम डिलीव्हरी अनुज्ञेय आहे.
q) जे इंन्डस्ट्रियल युनिट सद्यस्थितीत सुरु आहेत ते तसेच सुरु राहतील.
r) दिनांक २३/०६/२०२० च्या आदेशात नमुद केल्याप्रमाणे लग्न विषयक कार्यक्रम ५० व्यक्तीच्या संख्येच्या मर्यादेत आयोजित करण्यास मुभा असेल.
१०) राज्य सरकारचे विभाग/कार्यालये आणि सेवा प्रदान करणारे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएमयु) केवळ आवश्यक सेवा प्रदान करण्याच्या मर्यादेपर्यत कार्य करतील
११) कोविड-१९ रुग्णाना आरोग्य सेवा उपलभ करुन देण्यासाठी सर्व खाजगी व सरकारी रुग्णालयामध्ये सर्व वैकल्पिक शस्त्रक्रिया नियोजित करण्यात याव्यात,
१२) संबधित संस्था, संघटना व आस्थापनाच्या संदर्भात मा. पोलिस आयुक्त यांचे अधिनम्न अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी आणि इतर सक्षम प्राधिकारी उपरोक्त नियम आणि अमलबजावणीसाठी अधिकृत, न्याय मार्गाने सर्व आवश्यक उपाययोजना करतील. सर्व अंमलबाजवणी करणा-या अधिका-यांनी हे लक्षात घ्यायला हवे की तत्वत: मुलभुत कठोर प्रतिबंध लोकांच्या हालचालीशी संबधित आहेत.
१३) या नियमांच्या कोणत्याही तरतूदीचे उल्लघन करणारी कोणतीही व्यक्ती/संस्था यायेवर महामारी रोग अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, च्या अंतर्गत इतर संबधीत कायदे व नियमांच्या तरतूदीनुसार कारवाई केली जाईल.
१४ ) या नियमानुसार कोणत्याही गोष्टी केल्यास किंवा चांगल्या हेतूने कोणत्याही गोष्टी केल्यास, त्या व्यक्तीविरुध्द खटला किंवा कायदेशीर कारवाई होणार नाही.
१५) विविध प्राधिकारणाद्वारे, पूर्वी जारी केलेले सर्व आदेश, अंमलबजावणी संस्था, या आदेशासह अधिकमीत केले जातील.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏