पत्रलेखन पुरस्काराची रक्कम राज्यपालांकडून पोस्टातील करोना बाधितांसाठी

पत्रलेखन पुरस्काराची रक्कम राज्यपालांकडून पोस्टातील करोना बाधितांसाठी



मुंबई प्रतिनिधी : डाक विभागातर्फे आयोजित केलेल्या पत्र लेखन स्पर्धेत पुरस्कार रूपाने प्राप्त झालेल्या २५००० रुपयांच्या रकमेत, स्वतःच्या वेतनातून आणखी २५००० रुपये जोडून ही रक्कम डाक विभातील करोना बाधित कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी डाक विभागाला देणार असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज जाहीर केले.


          महात्मा गांधीच्या १५० व्या जयंती निमित्त डाक विभागाच्या महाराष्ट्र व गोवा परिमंडळाने ‘ढाई आखर’ स्पर्धेत “प्रिय बापू आप अमर है” या विषयावर ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत आंतरदेशीय पत्रलेखन गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक राज्यपाल कोश्यारी यांना प्राप्त झाले होते.


     दिगंबर वाघ


               कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


                      घरी राहा, सुरक्षित राहा 
                      प्रशासनाला सहकार्य करा...