NUJM खेड तालुका अध्यक्षपदी सुनील थिगळे यांची निवड

NUJM खेड तालुका अध्यक्षपदी सुनील थिगळे यांची निवड


NUJM खेड तालुका अध्यक्षपदी जय महाराष्ट्र न्यूज चे सुनील थिगळे यांची निवड


खेड प्रतिनिधी अनुराग पवार


      नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र ( NUJM )पुणे जिल्ह्याची खेड तालुका कार्यकारिणी बैठक आज खेड तालुक्यातील राजगुरूनगर इथे झाली. युनियनच्या राज्याच्या अध्यक्ष शीतल करदेकर,पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन चपळगावकर यांच्या आदेशाने  जिल्हा कार्याध्यक्ष-रायचंद शिंदे यांच्या उपस्थितीत आणि ज्येष्ठ पत्रकार किशोर भगत यांच्या अध्यक्षतेखाली  वार्षिक सभा आणि 
 नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली 
       खेड तालुका अध्यक्षपदी जय महाराष्ट्र   वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी सुनील थिगळे, कार्याध्यक्षपदी-दै लोकमतचे चाकण प्रतिनिधी चंद्रकांत मांडेकर, उपाध्यक्षपदी- सोशल मिरर चे संपादक किशोर भगत,सचिवपदी- दैनिक सकाळ चे कडूस प्रतिनिधी महेंद्र शिंदे,खजिनदार पदी -लोकमतचे कुरुळी प्रतिनिधी विजय मु-हे, कायदे सल्लागार पदी -पुणे ब्रेकिंग न्यूज चे  संपादक अँड. निलेश आंधळे यांची निवड करण्यात आली.
   युनियनचे  सदस्य पुढीलप्रमाणे:- रोहिदास गाडगे Etv भारत,नाजीम इनामदार दै पुण्यनगरी-राजगुरूनगर , शरद भोसले लोकमत-म्हाळुंगे, रवींद्र साकोरे लोकमत-काळूस,किशोर गिलबिले सरपंचनामा वेब पोर्टल-राजगुरूनगर
     दरम्यान कोरोना काळात झालेल्या पत्रकार संघटनेच्या  बैठकीत सोशल डिस्टनसिंग पाळत, मास्क व सॅनिटायझरचाही वापर  करण्यात आला.


         दिगंबर वाघ
               कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८


  घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका,  आपणच घेऊ आपली काळजी 🙏