जिल्हा पालक सचिवांची नेमणूक
मुंबई प्रतिनिधी : राज्यातील रिक्त झालेल्या जिल्हा पालक सचिव पदांवर नियुक्त्या करण्यात आल्याआहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव(उद्योग) बी.वेणूगोपाल; जालनाजिल्ह्यासाठी सामाजिक न्यायव विशेष सहाय्य विभागाचे सचिव पराग जैन-नैनुटिया, परभणी जिल्ह्यासाठी महसूल व वन विभागचे सचिव किशोरराजे निंबाळकर अमरावती जिल्ह्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या सचिव आय.ए.कुंदन, मुंबई उपनगरासाठी सामान्यप्रशासन विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, गडचिरोली जिल्ह्यासाठी महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आणि धुळे जिल्ह्यासाठी मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता वर्मा यांचा पालक सचिव म्हणूनसमावेश आहे.
यांसंदर्भातीलशासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असूनत्यांचा संगणक संकेतांक क्रमांक 202002281644501307 असा आहे.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी राहा, सुरक्षित राहा
प्रशासनाला सहकार्य करा...