लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विनम्र अभिवादन
मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी ऊसतोडणी मजुरांसाठी जीवनभर संघर्ष करणारे माजी उपमुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या रूपाने महाराष्ट्राला संघर्षशील लोकनेता, दिलदार विरोधी पक्षनेता लाभला.
पवार यांनी सांगितले, सत्तेत किंवा विरोधी पक्षात असताना त्यांनी नेहमी राज्याच्या हिताची भूमिका घेतली. आज महाराष्ट्र 'कोरोना'संकटाशी लढत असताना त्यांची उणीव निश्चित भासत आहे. कष्टकरी, सामान्य जनतेसाठी स्व.मुंडे यांनी दिलेलं योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल. संघर्षनायकाला विनम्र अभिवादन.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी राहा, सुरक्षित राहा
प्रशासनाला सहकार्य करा...