मुंबई उच्च न्यायालयाच्या उपसमितीसाठी ३ सचिव पद निर्मिती
मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समिती, उपसमितीसाठी सचिवांची पदे
मुंबई प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समिती व उप समिती नागपूर आणि औरंगाबादसाठी प्रत्येकी एक प्रमाणे 3 सचिव पदांची निर्मिती करण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यामुळे लोक न्यायालये, पर्यायी वादनिवारण केंद्र, सर्व तालुका तसेच गावपातळीवरील विविध विषयांवरील जनजागृती, विधी साक्षरता शिबिरे तसेच प्रशिक्षण शिबिरे असे उपक्रम राबविण्यात येऊन प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करता येईल.
ठाणे येथे अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय
ठाणे येथे कौटुंबिक न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांची संख्या तसेच जनहित याचिका 130/2004 (मनुभाई वाशी विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर) मध्ये ठाणे येथे अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे येथे एक अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली. या अतिरिक्त कौटुंबिक न्यायालयाकरिता न्यायाधिश-1, सहाय्यभूत कर्मचारी-10 याप्रमाणे पदे निर्माण करण्यास तसेच शिपाई संवर्गातील 2 पदे बाह्ययंत्रणेद्धारे भरण्यास मंजुरी देण्यात आली.
याकरिता येणाऱ्या रुपये 92,36,372/- इतक्या रकमेचा आवर्ती व रु. 15,67,000/- इतक्या रकमेचा अनावर्ती खर्च याप्रमाणे एकूण रु. 1,08,03,372/- इतक्या रकमेच्या खर्चास मंजुरी देण्यात आली.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी राहा, सुरक्षित राहा
प्रशासनाला सहकार्य करा...