स्वस्त धान्य गैरवापर वर मुंबई ठाणे येथे २९ दुकानदारां कारवाई

मुंबई, ठाण्यात गैरप्रकाराबद्दल 29 स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई
    - कैलास पगारे यांची माहिती



 


 मुंबई प्रतिनिधी : मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रात   दक्षता पथकाकडून गैरप्रकार करणाऱ्या २९ स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व मुंबईचे नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे यांनी दिली.


     मुंबई - ठाणे शिधावाटप क्षेत्रातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना (NFSA), प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आत्मनिर्भर भारत योजना तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या  ए पी एल शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य तसेच गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेलचा पुरवठा व वितरण यामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही याबाबत दक्षता घेण्याकरीता प्रधान कार्यालय तसेच परिमंडळ कार्यालय व परिमंडळ कार्यालय अधिनस्त शिधावाटप कार्यालयांतर्गत एकूण ४४ दक्षता पथके गठीत करण्यात आलेली आहेत.  या  दक्षता पथकामार्फत लॉकडाऊनच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत आतापर्यंत खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.


१) एकूण १३ शिधावाटप दुकानांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.  


२) एकूण ४ शिधावटप दुकाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे.


३) एकूण १२ शिधावाटप दुकानांवर जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


४) प्रधान कार्यालयाच्या फिरते पथकामार्फत ३ ठिकाणी धाडी टाकून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करुन जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


अ)  ४.एप्रिल .२०२०  रोजी अधिकृत शिधावाटप दुकान क्र४१-फ २१८ येथे १२०० कि.ग्रॅ. अतिरिक्त गहू, जप्त   मुद्देमालाची किंमत रुपये ३०, ०७२ /- गुन्हा नोंद क्र २३३/२०२० नयानगर पोलीस ठाणे, जि.ठाणे.


ब) ६ जून.२०२० रोजी अधिकृत शिधावाटप दुकान क्र.३३-ई-१४३ येथे टेम्पो क्र.एम.एच.-03-सी.पी.-3397, तांदूळ २७८३ कि.ग्रॅ. व गहू ४४६ कि.ग्रॅ. अतिरिक्त, जप्त मुद्देमालाची किंमत रुपये४६१४२० / गुन्हा नोंद क्र.१६७/२०२०, टिळकनगर पोलीस ठाणे, मुंबई.


क)  ९.जून.२०२० रोजी तुर्भे येथे पेट्रोल / डिझेल टँकर क्र.एम.एच.-६ -बी.डी.-३७७७ मधून अवैधरित्या डिझेल चोरी प्रकरणी जप्त मुद्देमालाची किंमत रुपये ३३,१५,६९,२ /-, गुन्हा नोंद क्र.२०३/२०२०, तुर्भे एम.आय.डी.सी.पोलीस ठाणे, नवी मुंबई.


     दिगंबर वाघ  


       कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏