रूग्णसेवा हीच ईश्वर सेवा

१० जुलै रोजी आरोग्य शिबीर व मोफत औषध वाटप करण्यात आले.


आनंद गोसकी व फॅमिली प्लॅनिंग असोशिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्तिक विद्यमानाने   कोरोनाच्या पार्शवभुमिवर ..


 


सोलापूर प्रतिनिधी : सध्या साऱ्या जगभरात कोरोना महामारीने थैमान माजविलेले आहे, व या महामारीमुळे नागरीक घरातुन बाहेर पडण्यास घाबरत आहेत, तसेच काही नागरिकांमध्ये हाॅस्पीलला जाण्यासाठी अजून हि भीती आहे व या भीती पोटी नागरिक दावाखान्याला जात नसल्याचे लक्षात घेउन आनंद गोसकी यांनी आपल्या परीसरातील नागरीक कसे निरोगी राहतील व कसे त्यांची काळजी घेता येईल या साठी आनंद गोसकी मित्र परिवार व फॅमेली प्लॅनिंग असोशिएशन च्या वतीने आरोग्य तपासणी करून ताप, सर्दी,खोखला,पोट दुखी,अंगदुखी,व ईतर आजारावर औषधे मोफत वाटप करण्यात आले, त्यावेळी कार्यक्रमाचे दीप प्रज्वल  जेष्ठनागरीक विठ्ठल सिंगराल यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी कार्यक्रमास राम मुटकीरी, शाम दामजी, सिध्देश्वर कोंडे प्रसाद मोहिते उपस्थित होते.


     कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी फॅमिली प्लॅनिंग अससोसिएशन च्या वतीने शिबिरामध्ये डॉ.महादेव धुत्तरगी, डॉ. शोएबा तांबोळी, व सिव्हिल हाॅस्पिटलचे डाॅ अमरनाथ सकनुरे,डॉ.आकाशकुमार गुप्ता, लॅब टेक्नीशियन श्री व्यंकटेश कंची, डॉ एच. पी. पाल, स्टाफ नर्स रोजमेरी गायकवाड, सुनीता पाटील, करण खानापुरे, कल्पना गडगडे, सुरेखा जाधव, सुरज कांबळे, वीरेंद्र परदेशी, यांचे मोलाचे मार्गदर्शन नागरिकांना मिळाले.


     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंद गोसकी मिञ परिवारातर्फे महेश दासी, ऋषिकेश चिलवेरी, आकाश बुर्ला , अथर्व वग्गा, दिनेश सुरा, जयराज यमेकर,वेणीगोपाल सामल,वसंत कामुर्ती, पुरषोत्तम वग्गा,दिपक बुधाराम,सतीष रच्चा क्रूष्णा सिंगराल,अमोल शेट्टी यांनी परीश्रम घेतले. 


     प्रभागातील नागरिकांची संख्या पाहता सदर आरोग्यशिबीर विणकर बागे समोर अग्नीशामक दल शेजारी  उद्या ११ जुलै २०२० वार शनिवार   वेळ सकाळी ९:०० ते १ पर्यंत सिव्हिल हाॅस्पिटल कडुन डाॅ व्यस्था करून दोन दिवसा मध्ये ३०४ लोकांना लाभ मिळाल  आहे. तरी जास्तीत ज्यास्त नागरीकांने उत्सपुर्थ प्रतिसाद मिळाल्याच  रूग्णसेवक आनंद गोसकी यांनी सांगितले.


 दिगंबर वाघ                


        कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏