कोरोना युध्दाचा असा होता आठवडा

असा होता आठवडा


१२ जुलै ते १८ जुलै २०२० या कालावधितील शासनाचे निर्णय व इतर घडामोडींचा संक्षिप्त आढावा



 मुंबई प्रतिनिधी : 


१२ जुलै २०२०


·        आज ३३४० रुग्णांची घरी रवानगी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.१५ टक्के, आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेले रुग्ण- १ लाख ४० हजार ३२५. कोरोनाच्या ७८२७ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख ३ हजार ५१६ रुग्णांवर उपचार सुरू, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख  १७ हजार ८९५ नमुन्यांपैकी २ लाख ५४ हजार ४२७ नमुने पॉझिटिव्ह (१९.३ टक्के), ६ लाख ८६ हजार १५० लोक होम क्वारंटाइन. ४७ हजार ८०१ लोक संस्थात्मक क्वारंटाइन. आज १७३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद, मृत्यूदर ४.४ टक्के.


·       भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने कोरोना निदानासाठी शिफारस केलेल्या रॅपिड ॲण्टी बॉ‍डिज चाचण्या किंवा किटचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत चार सदस्यीय समिती गठीत. कंपन्यांमार्फत उत्पादीत किटचा अभ्यास करून दहा दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश. समिती अध्यक्ष- राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे, सदस्य- ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वर, प्रा. डॉ. अमिता जोशी.


·       जुलै महिन्यात आतापर्यंत 9 लाख 26 हजार 140 क्विंटल अन्नधान्याचे वाटप.


·       1 एप्रिल ते 11 जुलै या कालावधीत 1 कोटी 66 हजार 739 शिवभोजन थाळ्यांचे वाटप.


·       वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत ५३ देशातून २३९ विमानांव्दारे ३५ हजार ९७१ प्रवासी मुंबईत दाखल, यामध्ये मुंबईतील प्रवासी- १२ हजार ५७०, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवासी- १२ हजार २९५, इतर राज्यातील प्रवासी- ११ हजार १०६. 


·       जालना येथील कोविड-१९ आरटीपीटीसीआर प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री  उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन.


·       कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने आपल्या प्रकृतीसंदर्भात प्रसार माध्यमांमध्ये काही ठिकाणी प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार असून आपली तब्येत चांगली असल्याचे राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून स्पष्ट.


१३ जुलै २०२०


·       कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भावामुळे रुग्णांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नसल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांच्याद्वारे स्पष्ट. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत कोविड-19चा वाढता प्रादुर्भाव आणि अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात आढावा. सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेणे योग्य होणार नाही या भूमिकेवर बैठकित शिक्कामोर्तब. याबाबत सर्व १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंचे लेखी  निवेदन. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून योग्य सूत्र वापरून निकाल घोषित करणार, कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर कमी गुण मिळाले आहेत असे वाटणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेची  संधी. मागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या अंतिम सत्र/वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे असल्यास तसे लेखी निवेदन घेऊन निकाल घोषित करणार. विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची असल्यास लेखी स्वीकृती घेऊन परीक्षेस बसण्याची संधी, कोविड-१९ चा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव विचारात घेऊन, संबंधित जिल्हाधिकारी तथा आपत्ती निवारण प्राधिकरण यांच्या सल्ल्याने निर्णय.  ज्या ९ राज्यांनी परीक्षा रद्द केल्या त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार.


·        बाष्पके, प्रेशर व्हेसल, पायपिंग निर्मिती /उभारणी करण्यापूर्वी त्यांचे आरेखन (ड्रॉईंग) संचालकांकडून मान्य करण्यास कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे बाष्पके संचालनालयाला येणाऱ्या  लक्षात घेऊन बाष्पके व पाईपिंगच्या आरेखन मान्यतेसाठी www.mahaboiler.com या पोर्टलवर ऑनलाइन सुविधा सुरू. कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्याच्या व्यवसाय सुलभता धोरणाच्या अनुषंगाने आर्थिक प्रगतीमध्ये हातभार लावण्यासाठी पोर्टलचा प्रारंभ, या सेवेमुळे उद्योजकांचा वेळ, पैसा, शारीरिक व मानसिक त्रास वाचणार. महाराष्ट्रामार्फत देशात पहिल्यांदाच सर्व बाष्पकांना १५ जूनपर्यंत अविरतपणे सुरु ठेवण्यासंबंधी बाष्पके संचालनालयामार्फत निर्णय व प्रमाणीकरणातून सूट.


·       कोविड संदर्भात १ लाख ६७४ हजार गुन्हे दाखल, ३० हजार ३२४ व्यक्तींना अटक,  अत्यावश्यक सेवेसाठी  पोलीस विभागामार्फत ५ लाख ९१ हजार ८३  पासेसचे वितरण, अवैध वाहतूक करणाऱ्या १३३५ वाहनांवर गुन्हे दाखल ९१,०४६ वाहने जप्त.


·       कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत असली तरी या संदर्भात फसवणूक  होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने त्यापासून सावध राहण्याचे, गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन. गरजू लोकांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना फसवण्याचा उद्देशाने  प्लाझा दानाबाबत बनावट प्रमाणपत्र तयार केली जात असल्याचे,  देशमुख यांचे प्रतिपादन.


·        धारावी परिसरात कोरोना युद्धात सरशी झाल्याने मोठा दिलासा मिळाला असून कोरोना साखळी तोडण्यासाठी नवा "धारावी पॅटर्न" समोर. कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा, डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार, स्थानिक खासदार, आमदार, महानगरपालिका, यांच्या प्रयत्नांमुळे हे यश. या मोहिमेत पोलीस विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल या सर्वांचे गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांच्यामार्फत अभिनंदन.


·         1 जुलै ते 12 जुलैपर्यंत 64 लाख 39 हजार 338 शिधापत्रिका धारकांना 10 लाख 85 हजार 470 क्विंटल अन्नधान्याचे वाटप.


·       जुलै महिन्यात आतापर्यंत 11 लाख 82 हजार 130 शिवभोजन थाळ्यांचे वाटप.


·       ४१८२ रुग्णांची घरी रवानगी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३८ टक्के, बरे होऊन घरी परतलेले रुग्ण - १ लाख ४४ हजार ५०७. ६४२९ नवीन रुग्णांचे निदान , १ लाख ५ हजार ६३७ रुग्णांवर उपचार सुरू, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख  ४२ हजार ७९२ नमुन्यांपैकी २ लाख ६० हजार ९२४ नमुने पॉझिटिव्ह (१९.४३ टक्के). ६ लाख ८७ हजार ३५३ लोक होम क्वारंटाइन. ४१ हजार ६६० लोक संस्थात्मक क्वारंटाइन. आज १९३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद, मृत्यूदर ४.२ टक्के.


१४ जुलै २०२०


·       कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ असा उल्लेख केल्या प्रकरणी कृषीमंत्री श्री दादाजी भुसे यांच्याद्वारे गंभीर दखल. शासनाचे निर्देश नसताना तसा उल्लेख  करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे श्री भूसे यांचे सूतोवाच.


·       1 जुलै ते 13 जुलै पर्यंत 70 लाख 68 हजार 597 शिधापत्रिका धारकांना 12 लाख 54 हजार 910 क्विंटल अन्नधान्याचे वाटप.


·        1 जुलै ते दि . 13 जुलै पर्यंत 12 लाख 81 हजार 126 शिवभोजन थाळ्यांचे वाटप.


·       वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत 250  विमानांद्वारे 37 हजार 90  प्रवासी मुंबईत दाखल. यामध्ये मुंबईतील प्रवासी- 12 हजार 907 , उर्वरित महाराष्ट्रातील प्रवासी- 12 हजार 646  , इतर राज्यातील प्रवासी- 11  हजार 537  .


·       ४५०० रुग्णांची घरी रवानगी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६७ टक्के. आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेले रुग्ण- १ लाख ४९  हजार ७ . ६७४१ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख  ७ हजार ६६५ रुग्णांवर उपचार सुरू, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख  ७२ हजार नमुन्यांपैकी २ लाख ६७ हजार ६६५ नमुने पॉझिटिव्ह (१९.४९ टक्के). आज २१३ मृत्यूंची नोंद, मृत्यूदर ४ टक्के.


·       लॉकडाऊन कालावधीनंतर जून महिन्यात देण्यात आलेल्या वाढीव बिलांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांची बैठक. ठळक मुद्दे- लॉकडाऊन कालावधीत आर्थिक विंवचनेत अडकलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी वाढीव वीजबिलाबाबतच्या तक्रारींची पडताळणी केली जाईल. त्याशिवाय वीजजोडणी कापली जाणार नसल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून स्पष्ट. एकूण वापराच्या विजेच्या बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र सोडून वीज बिलाची पडताळणी करण्याचे बेस्ट, टाटा, महावितरण व अदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांना डॉ राऊत यांचे निर्देश.


·       मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत बकरी ईद आयोजनासंदर्भात संदर्भात ऑनलाइन बैठक, यावेळी  उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित. ठळक मुद्दे-  कोरोनाची झपाट्याने होत असलेली वाढ रोखण्याचे प्रयत्न. गेल्या 4 महिन्यात सर्व धर्मीयांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे, त्याचप्रमाणे बकरी ईद साधेपणाने, जमल्यास प्रतिकात्मकरीत्या आणि नियमांचे पालन करून साजरी करा, गर्दी होऊ न देणे याकडे लक्ष देणे आवश्यक. वाहतुकीमुळे साथीचा रोग पसरण्याची शक्यता. यावर्षी संकटाचा सामना करून पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात सण-उत्सव साजरे करू. त्यामुळे बकरी ईद निमित्त बकरी खरेदी करण्यासाठी आग्रह  करु नका.


·       उर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण कंपनीची आढावा बैठक. निर्देश-   मीटरवरील प्रत्यक्ष रीडिंग घेऊनच देयक द्या. सरासरी देयक टाळा, स्थानिक कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपवून नियोजन करा. धनादेशाद्वारे वीजदेयके भरणाऱ्या ग्राहकांच्या मदतीसाठी विशेष कक्ष स्थापन करा. कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील (कंटेन्मेंट झोन) वीजदेयकाची वसुली वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करा. देयक एकरकमी भरणाऱ्या ग्राहकांना 2 टक्के सवलत , तीन समान हप्त्यात देयक भरण्याच्या सुविधेबाबत ग्राहकांना माहिती द्या. निसर्ग चक्रीवादळामुळे वीजपुरवठा बाधित कोकणातील वीज ग्राहकांचा स्थिर आकार माफ करण्याचा निर्णय.


·       २२ मार्च ते १३ जुलै  या कालावधीत  १,७६,४१८ गुन्ह्यांची नोंद, ३० हजार ३३० व्यक्तींना अटक, अवैध वाहतूक करणाऱ्या १३३५ वाहनांवर गुन्हे दाखल, ९१,१२७ वाहने जप्त. 


·       मुंबई आणि ठाणे शिधावाटप यंत्रणेच्या दक्षता पथकामार्फत 9 लाख 42 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त. यामध्ये  मध्ये तांदूळ 2150 कि.ग्रॅ. व गहू 2600 कि.ग्रॅ गव्हाचा समावेश.


·        1 जुलै ते दि. 13 जुलै पर्यंत 868 शिवभोजन केंद्रातून 12 लाख 81 हजार 126 शिवभोजन थाळ्यांचे वाटप.


·       1 जुलै ते 13 जुलै पर्यंत 70 लाख 68 हजार 597 शिधापत्रिकाधारकांना 12 लाख 54 हजार 910 क्विंटल अन्नधान्याचे वाटप.


 


१५ जुलै २०२०


·       1 जुलै ते दि.14 जुलैपर्यंत 869 शिवभोजन केंद्रातून 13 लाख 81 हजार 32 शिवभोजन थाळ्यांचे वाटप.


·       1 जुलै ते 14 जुलैपर्यंत 77 लाख 52 हजार 163 शिधापत्रिका धारकांना 14 लाख 41 हजार 50 क्विंटल अन्नधान्याचे वाटप


·       ३६०६ रुग्णांची घरी रवानगी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३७ टक्के, बरे होऊन घरी परतलेल रुग्ण - १ लाख ५२  हजार ६१३, ७९७५ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख  ११ हजार ८०१ रुग्णांवर उपचार सुरू, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ लाख  ८ हजार ९०१ नमुन्यांपैकी २ लाख ७५ हजार ६४० नमुने पॉझिटिव्ह (१९.५६ टक्के), ७ लाख ८ हजार ३७३ लोक होम क्वारंटाइन. सध्या ४३ हजार ३१५ लोक संस्थात्मक क्वारंटाइन. आज २३३ मृत्यूंची नोंद, मृत्यूदर ३.९६ टक्के.


·       बकरी ईद संदर्भात लवकरच मार्गदर्शक तत्त्वे आखली जाणार असल्याची मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांची पत्रकार परिषदेत माहिती.  


·       कोरोना काळात विद्यार्थ्यांना विविध कौशल्य प्रशिक्षण ऑनलाइन साधनांच्या आधारे देता येणे शक्य असल्याने राज्याच्या विविध भागातील  गरजेनुसार अशा प्रशिक्षणांचे आयोजन, आरोग्य विषयक कौशल्य प्रशिक्षणावर भर देण्याची कौशल्य विकास आणि रोजगार विकास मंत्री श्री नबाब मलीक यांची जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात घोषणा. 


·       लहान बालकांचे योग्य पोषण होणे हा अंगणवाडी केंद्रांचा महत्वाचा उद्देश असल्याने कोरोना कालावधीत आवश्यक सुरक्षा उपाययोजना व सावधानता बाळगून या कामात खंड पडू दिला जाऊ नये अशा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या सूचना.


·       नागरिकांना स्वस्त दरात मास्क व सॅनिटायजर मिळण्यासाठी त्यांच्या किंमती नियंत्रणात आणण्याबाबत आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे उपस्थित. ठळक मुद्दे-  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क आणि सॅनिटायजरच्या वापरात वाढ त्यामुळे त्यांच्या किंमती निश्चित करण्यासाठी समितीचे गठण, मास्क आणि सॅनिटायजरचा समावेश जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत करण्यासाठी केंद्राकडे मागणी करण्याचा निर्णय. साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत मास्क आणि सॅनिटायजरच्या किमती नियंत्रणात आणता येतील का याबाबत केंद्रीय कायदा तपासून विधी व न्याय विभागाने अभिप्राय देण्याचे  टोपे यांचे निर्देश.


१६ जुलै २०२०


·       वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत विविध देशातून २७५ विमानांद्वारे ४० हजार ५९९  प्रवासी मुंबईत दाखल, यामध्ये मुंबईतील प्रवासी- १३ हजार ८०५, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवासी- १४ हजार ३३८, इतर राज्यातील प्रवासी- १२ हजार ४५६. 


·       २२ मार्च ते १५ जूलै  या कालावधीत  १,८३,४३५ गुन्ह्यांची नोंद, ३०,६२९ व्यक्तींना अटक.


·       ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’ साठी ' महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई' च्यावतीने 21 लाख 19 हजारांचा धनादेश उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द.


·       1 जुलै ते दि . 15 जुलै पर्यंत 869 शिवभोजन केंद्रातून 14 लाख 78 हजार 748 शिवभोजन थाळ्यांचे वाटप.


·       कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील लोकांना प्रतिकारशक्ती वाढीसाठी अर्सेनिक अल्बम ३० हे होमोओपॅथीक औषध आणि संशमनोवटी हे आयुर्वेदिक औषध मोफत देण्याच्या निर्णयाबाबत  भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार  चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेले विधान दिशाभूल करणारे, त्यामुळे शासनाची बदनामी झाल्याने याबद्दल श्री पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करण्याचे ग्रामविकास मंत्री  हसन मुश्रीफ यांच्याद्वारे पाटील यांना पत्र.  


·       अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याद्वारे मुंबईतील रहेजा व हिंदूजा रूग्णालयांतील सुविधा व उपलब्ध औषधांचा साठ्याची तपासणी.


·       सायबर संदर्भात ५४२  गुन्हे दाखल, २८४ व्यक्तींना अटक.          


·       ५५२७ रुग्णांची  घरी रवानगी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६३ टक्के ,आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेले रुग्ण-  १ लाख ५८ हजार १४०. ८६४१ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख १४ हजार ६४८ रुग्णांवर उपचार सुरू. उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ लाख  ४६ हजार ३८६ नमुन्यांपैकी २ लाख ८४ हजार २८१ नमुने पॉझिटिव्ह (१९.६५टक्के). ७ लाख १० हजार ३९४ लोक होम क्वारंटाइन. ४२ हजार ८३३ लोक संस्थात्मक क्वारंटाइन. आज २६६ मृत्यूंची नोंद, मृत्यूदर ३.९


   दिगंबर वाघ                


        कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏