गुहागर खारवी समाज ज्ञाती यांची वार्षिक सभा संपन्न


गुहागर प्रतिनिधी अनंत सोलकर : गुहागर तालुका खारवी समाज ज्ञाती बांधव गट क्रमांकची सर्वसाधारण वार्षिक सभा आज दिनांक ३० जुलै २०२० रोजी वेळणेश्वर येथे अयोध्यापती प्रभू रामचंद्र मंदिरामध्ये संपन्न झाली. सदरील सर्वसाधारण वार्षिक सभेला समाजातून आदरणीय जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते,समाजाचे हितचिंतक,समाजाचे मार्गदर्शक आठ गाव समिती सदस्य आणी सन्मानीय समिती पदाधिकारी सभेला उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन  चैतन्य सुधाकर धोपावकर यांनी केल. तसेच सभेची प्रस्ताविकता सन्मानीय समीर शंकर पावसकर यांनी केल.सदरील वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गुहागर तालुका खारवी समाज ज्ञाती बांधव गट क्रमांक -3 चे नवनिर्वाचित अध्यक्ष  वेळणेश्वर ग्रुप ग्रामपंचायतिचे माजी उपसरपंच गणपतजी कृष्णा पालशेतकर, उपाध्यक्षपदी वेळणेश्वर गावचे पोलीस पाटील, गुहागर तालुका खारवी समाज संघटनेचे सहसचिव चैतन्य सुधाकर धोपावकर,सचिवपदी वेळणेश्वर गावचे धडाडीचे युवा सामाजिक कार्यकर्ते सन्मानीय समीर शंकर पावसकर,तर सहसचिव पदी समाजाचे उमदे युवा सामाजिक कार्यकर्ते सन्मानीय संदेश चंद्रकांत पालशेतकर यांची नियुक्ती सभेमध्ये करण्यात आले सदरील सभेला मावळते विद्यमान अध्यक्ष आदरणीय मारुतीजी होडेकर साहेब उपाध्यक्ष सन्मानीय पांडुरंगजी पावसकर साहेब तसेच सचिव प्रवीणजी पालशेतकर साहेब यांनी सभेला संबोधित केले. सदरील सभेचे आभार प्रदर्शन  समीर गजानन धोपावकर यांनी केल.


   दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏