आली रे आली गटारी आली


सोमवार दि.२० जुलैला म्हणजे आषाढ अमावास्या..
संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यांत येते.त्यालाच दर्श अमावास्या किंवा दीप पुजा किंवा सोमवती अमावास्याही म्हणतात..मुंबई प्रतिनिधी : अर्थातच यानंतर श्रावण मासारंभ होत असतो. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात दिव्याची मनोभावे पुजा केली जाते.त्यामागे श्रद्धा असेल  वा भौगोलिक जाण असेल...
       पण पालघर तालुक्यात या दिवशी गत+ आहारी= गटारी साजरी केली जाते.अर्थातच शास्त्रात सांगितल्याप्रमाणे पुढील दिवसापासून श्रावण महिना सुरू होईल आणि मास-मासे खाणे चुकीचे आहे. म्हणून आम्ही घरात पाळलेला किंवा शेजारचा वा नातेवाईकांकडून मिळालेला गावठी कोंबडा मारुन जेवण केले जायचे...घरात मंडळीही एकत्र कुटुंब पद्धतीमुळे जास्त असायची त्यामुळे एक-दोन तुकडे(खडे) मिळाले तर नशीब...पण अशी ही  गटारी साजरी व्हायची..त्यानंतर मात्र कडक श्रावण . नो मास- मासे. नो मद्य .संपूर्ण श्रावण फक्त  पापड- लोणची- चटणी..भाजीपाला... तांदळाची पेज यावरच..पण मजा यायची.,.
पण मागील १४-१५  वर्षापासून या पालघर कोकणपट्टीत या दीप अमावास्याने फारच गैरप्रकाराचे स्वरूप धारण केले गेले आहे.
    आमचा शेतकरी शेतात रोपणीची कामे सुमारे २२-२३ दिवस  घरातील पती..सुनबाई..
मुले- नातवंडे यांच्यासह रोपणीची कामे करीत असे.शेती हेच जीवन असे.शेतात जेवढे भातधान्ये जास्त पिकत असे तेवढा तो सुखी तर असायचाच व  त्या शेतकऱ्यांच्या घरात किती कणगी धान्य भरलेली आहेत त्यावर त्याची जातीत व समाजात पत ठरत असे.म्हणून शेतक-याचे कुटुंब सकाळपासून संध्याकाळ पर्यंत घरादाराची साफसफाईकडे लक्ष देऊ शकत नसे.. या आवणी रोपणीच्या काळात सतत मेहनत करुन थकलेला शेतकरी व मंडळी रोपणी झाली की मजा म्हणून  एकमेकांवर  चिखल फेकून शेहळी..हय म्हणून  साजरी करीत असे.त्यावेळी मजूरांना मजा व श्रमपरिहारार्थ गावातील दारु  फुटक्या कपात नाहीतर  पानाच्या द्रोणात थोडी थोडी देत असत..आणि कोंबडा..मासाहार...देत असत. रोपणी झाली म्हणून शेतकरी खूष म्हणून मजूरही खूष असत...ही शेहळी आसायची.. गटारी नव्हे..
         पण मागील १४-१५ वर्षापासून  या शेहळीला आम्ही गटारी नाव दिले आणि  आज या दीप अमावास्येचे वैदिक, धार्मिक  वा शास्त्रीय महत्त्व नष्ट होत चाललेले आहे. मागील १४-१५ वर्षापासून पालघर तालुक्यात औद्योगिकरण झाले..शेतकऱ्यांच्या मुलांना कामगार म्हणून कामे मिळाली..अल्पवयात हाती पैसा नाचू लागला.औद्योगिकरणामुळे वासाहती वाढू लागल्या...शेत जमिन गेली.साध्या घरांचे बंगले झाले..शेती असलेल्या शेतकऱ्यांची मुले आवणी करीतच नाहीत...नव्हे आवणी हा प्रकारच माहिती नाही...मात्र गटारी जोरदार केली जाते... गाणी..बॕजो डीस्को..मद्य..मटण..मासे..गावठी..ब्राॕयलर....सर्वच  जोरदार असते..एवढे खातात पितात की कधीच खाल्ले -पिली नव्हती व यापुढे मिळणारही नाही. थोडक्यात मर्यादांचे उल्लंघन...यावर ज्याची त्याची प्रेस्टिज....असो. तर शेतकऱ्यांच्या शेहळीचे रुपांतर गटारीत  हळूहळू  होत गेले...शेतकऱ्यांची शेती कमी झाली..शेहळी प्रकार कमी झाला आणि मात्र गटारीने या प्रदेशात भक्कम पाय रोवले...
            महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यात व खेडोपाडी म्हणजे समुद्र सानिध्य नसलेल्या प्रदेशात  गटारी हा प्रकार माहीतच नव्हता.मागील ५/६ वर्षापासून लातुर..परभणी.नगर..कोल्हापूर..अकोला..वगैरे भागात गटारी हा प्रकार रुजू लागला आहे.मोबाईलच्या युगात या गटारीचा धांगडधिंगा व त्यातून उद्भवलेले गैरप्रकार दिसतात व दिसतीलही..
   शेती गेली..शेतीकडे दुर्लक्ष होत आहे पर्यायाने संस्कृती नष्ट होत आहे.
      आपला शेतकरी सुमारे एक महिनाभर रोपणी करीत असे.त्यावेळी घरातील कपड्यांची..घराची..घरातील दिवाबत्तीची साफसफाई केली जाऊ शकत नव्हती..आवणी झाल्यावर घरातील गृहिणींकडून घर..कपडे व दिवाबत्ती स्वच्छ कले जात आणि मग दीप अमावास्या दिव्यांना  पाटावर बसवून पुजा केली जायची.घरातील वातावरण पवित्र व आनंदी बनवित..
     पण आज या गटारीने आपल्या शेतकऱ्यांना संस्कृतीचा विसर पाडायला लावला आहे.
या दिवशी मातृपितृ..वडीलधा-या मंडळींना नमस्कार केला जात असे.
 मंडळी  गत म्हणजे गेलेला आहार...म्हणजे मागील कार्तिक महिन्यापासून आजपर्यंत  जेवढा मास..मटण...मासे यांचा जमदार आहार घेतला गेला आहे..तो गेला.. गत+ आहार... त आणि  आ अक्षरांचा संधी झाला की त चा टा झाला  म्हणून गटारी हा शब्द  तयार झाला..दारू- मास-मटण  खाऊन गटारात पडण्यासाठी नव्हे. हे आपण लक्षात घेणे योग्य  होईल. मंडळी ठीक आहे आता आपणाकडून गटारी साजरी केली जाणार आहेच ना तर मग घरातील ..धर्माची  संस्कृती जपा..घरात  सोमवती अमावास्या साजरी करा देव..मातृपितृ यांना नमस्कार करु या आणि मग  मर्यादांचे उल्लंघन न करता गटारी साजरी करु या.
दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजसा तेज उत्तमम्!
गृहाणमत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भवा!!
म्हणजे हे दीपा तू सूर्यरूप व अग्नीरूप आहेस.तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस.आमच्या पूजेचा तू स्वीकार कर आणि आमच्या सर्व इच्छा पूर्ण कर.
       माणसांनी कितीही मीपणा मिरविण्याचा प्रयत्न केला तरी देव श्रेष्ठ आहे हे नाकारू शकत नाही.मग अशा शुभदिनी आपण देवाला का नाकारायचे? र मंडळी...या महिन्यानंतर सूर्याचे दक्षिणायण सुरू होते..दिवसाची लांबी कमी होते. तापमान हळूहळू कमी होत जाते हवा ओलसर व दमद असल्याना व परिसरातील अस्वच्छता यामुळे हवेतील रोगजंतूचे प्रमाण वाढत असते आणि माणसांची शरीरातील अग्नी मंदावतो( अग्नीमांद्य ). पचनक्रिया मंदावलेली असते.अशावेळी शाकाहारी आणि  हलके व शुद्ध आहाराची गरज असते. नाहीतर आजाराला आमंत्रण  असते. आपण आजारी होऊ शकतो.म्हणून मांसाहार व अशुद्ध आहार टाळण्यासाठी श्रावण पाळणे आवश्यक असते. आणि जर  आपण आजारी पडलो आणि देवाचा धावा केला तरी देव धावत येणार नाही.कारण आषाढ ते कार्तिक हे चार महिने देव क्षीरसागरात झोपलेले असतात.(देवशयनी एकादशी).ते आपल्याकडे लक्ष कसे देतील?  म्हणून हे चातुर्मास पाळणे फारच महत्वाचे आहे..
       आली रे आली गटारी या आनंदात मस्तमद्यधुंद होऊन जाऊ नका.त्याऐवजी  देव व संस्कृती  जपली गेलीच पाहिजे. आपली संपत्ती आणि आरोग्य जपण्यासाठीच ही दीप अमावास्या असते..आरोग्य हीच संपत्ती आहे.  दोन्ही  जपा...
  सोमवती अमावास्येच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा.


 


 दिगंबर वाघ                


       कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏