फुलंब्री प्रतिनिधी : फुलंब्री तालुक्यातील कविटखेडा या गावातील गिरीजा नदीपात्रातील बंधारा फुटल्याने बंधाऱ्या लगतची शेती वाहून गेली आहे. या प्रकरणाची दखल घेत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज 5 वाजता पाहणी केली.तालुक्यात अतिवृष्टीमुळे नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. बंधाऱ्याचे दरवाजे पूर्ण बंद असल्यामुळे पाण्याला जाण्यासाठी अडथळा निर्माण झाला. यामुळे बंधाऱ्याच्या शेजारी असणाऱ्या शेतातून पाणी पुढे नदीत उतरले. पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे बरीच शेती वाहून गेली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज या सर्व शेताची पाहणी करत सर्व शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले. यावेळी कविटखेडा गावातील गावकरी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८