वाघवळीवाडा बुद्धलेणी बचावासाठी केंद्रीय मंत्री आठवले यांची धाव.
आंतरराष्ट्रीय परिचित पुज्य भदंत शिलबोधी यांच्या लढ्याची केंद्राने घेतली दखल
नवी मुंबई प्रतिनिधी : येथील उलवे परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ घातले असून वाघवळीवाडा बुद्धलेणी च्या संवर्धन व पुनर्वसनाचा प्रश्न पँथर ऑफ सम्यक योद्धा या राष्ट्रीय संघटनेने उचलला आहे, आंतरराष्ट्रीय परिचित पुज्य भदंत शिलबोधी यांच्या नेतृत्वात संविधानिक लढा उभारला असून या लढ्याला घवघवीत यश मिळत आहे. याचीच प्रचिती म्हणजे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची लेणी स्थळाला भेट.
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामा अंतर्गत येथिल गावचे पुनर्वसन करण्यात येत आहे, प्राचीन व ऐतिहासिक लेणी मध्ये स्थानिक गावकऱ्यांनी केरुमाता देवी ची प्रतिष्ठापना करून पूजा अर्चना करून या लेणीचे जतन व संवर्धन केले आहे, मात्र सिडको प्रशासनाने केरुमाता देवीचे पुनर्वसन केले किंतु लेणीचे विद्रुपीकरण करून लेनिवर माती टाकून लेणीचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला आहे,
सदर घटनेची चाहूल पँथर योद्धा वीरेंद्र लगाडे यांना लागली असता पँथर डॉ राजन माक्निकर यांना माहिती दिली आणि पँथर योद्धा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिलबोधी यांच्या नेतृत्वाखाली लेणी बचाव आंदोलनास सुरुवात केली, यावेळी OBC नेते राजाराम पाटील मागील 4 वर्षांपासून पुनर्वसन आंदोलन करत असून लेणी बचावासाठी प्रयत्नशील असल्याचे भेटीअंती सांगितले. त्या अनुषंगाने पँथर ऑफ सम्यक योद्धा या राष्ट्रीय समाजसेवी संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला याची दखल बहुतांश प्रसारमाध्यमांनी घेतली. पुज्य भदंत शिलबोधी यांनी जाहीररीत्या प्रशासनाला ठणकावले, आंदोलनाचा इशारा दिला, लेणीचे जतन नाही केले तर भारतासह जगातील भिक्खू संघ आंदोलनात उभारतील आणि जागतिक प्रश्न निर्माण होईल असा इशाराही दिला. नवी मुंबई RPI नेते महेश खरे यांनी प्रकरणाचे महत्व जाणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना लेणी संवर्धनासाठी प्रत्यक्ष पाहणी करण्यास भाग पाडले.
केंद्रीय मंत्री आठवले यांनी लेणीचे पाहणी केली व कोणत्याही परिस्तिथीत लेणीचे संवर्धन व पुनर्वसन करण्यात येईल, लेणी अवशेषांचे जतन करून बौद्ध स्तूप उभारण्यात येईल या बद्दल पुरातत्व खाते आणि मुख्यमंत्यांना पत्र पाठवेन अशी प्रसारमध्यांना पुढे बोलतांना ग्वाही दिली. यावेळी पँथर सम्यक योद्धाचे पुज्य भदंत शिलबोधी आठवले यांच्यासोबत पाहणी केली, पँथर श्रावण गायकवाड, पँथर डॉ राजन माकणीकर, वीरेंद्र लगाडे, OBC नेते राजाराम पाटील, पनवेल उपमहापौर जगदीश गायकवाड, सुरेश बारशिंग, RPI नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओव्हाळ, आदी अनेक मान्यवर व शेकडो RPI व पँथर कार्यकर्ते उपस्थित होते.बौद्ध लेणीच्या जतनासाठी बौद्धभिखु, ग्रामस्थ आंदोलनात उतरले असून देशातील ही पहिली बौद्ध लेणी होय, जिच्यासाठी हिंदू मुस्लिम व बौध्येतर लेणी बचावासाठी आंदोलनात उतरले आहेत. OBC समाजामध्ये जनजागृती आणून समता पेरण्याचे काम राजराम पाटील यांचे हातून होत असल्याचे पुज्य भदंत शिलबोधी यांनी कौतुकात सांगितले व त्याच्या पुनर्वसनाच्या कामात ग्रामस्थांच्या सोबत असल्याचे वाचन भन्ते यांनी दिले.
पुज्य भदंत व त्यांच्या टीमने घेतलेल्या लेणी बचाव आंदोलनाच्या आंदोलनात संविधानतज्ञ सुरेश माने, ना. रामदास आठवले यांच्या आगमनाने आंदोलनाला एक सकारात्मक दिशा लाभली असून असंख्य राजीकय पक्ष प्रमुखांनी आंदोलनात सहभागी असल्याचे सांगितले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे युवाध्यक्ष कनिष्क कांबळे, RPI (खरात) राजाराम खरात यांनी आंदोलनास पाठिंबा असल्याचे सांगून लवकरच भेट देणार असल्याचे दूरध्वनिहून सांगितले. सदर देणीच्या संवर्धन व आंदोलनास भारतातील इतिहासप्रेमी, लेणी अभ्यासक व अनुयायांनी सहभागी व्हावे असे आवाहन पुज्य भदंत शिलबोधी यांनी प्रसारमाध्यमांच्या वतीने केले आहे.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏