तीन वर्षांच्या स्वराने विश्व विक्रम केला

स्वरा हिने या मुलींनी एका मिनिटात ३८ वेळा जिभ नाकाला लावलीकोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील स्वरा या मुलींने नाकाला एका मिनिटात ३८ वेळा जीभ लावून अनोखा रेकॉर्ड केला आहे तीन वर्षाच्या स्वरा नामदेव निर्मळे हिने. शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी मध्ये राहणाऱ्या स्वरा निर्मळे हिच्या रेकॉर्ड ची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. या अगोदर स्वरांचे वडील नामदेव निर्मळे यांनी हि रेकॉर्ड केला होता. याबाबत बी न्यूज ने टाकलेला प्रकाशझोत. 


   शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी इथील नामदेव निर्मळे या शेतकऱ्यांने. लहान पणा पासून काही तरी वेगळं करायची आवड असणाऱ्या नामदेव ने वर्तमान पत्रात वाचले की एका माणसाने नाकाला एका मिनिटात १३० वेळा जीभ लावण्याचा रेकॉर्ड केलेली बातमी . हे वाचल्यावर आपण ही हे करू शकते यांची जाणीव झाल्याने नामदेव ने यांचा सराव करून एका मिनिटात १५० वेळा जिभ नाकाला लावून रेकॉर्ड केला. यांची नोंद ग्लोबल रेकॉर्ड मध्ये ही झाली. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तीन वर्षांच्या स्वरा ने ही एका मिनिटात ३८ वेळा जीभ नाकाला लावून नवा विक्रम केला. यांची दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. याबाबत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड कडून पाठविण्यात आलेले प्रमाणपत्र, मेडल, टाॅफी लोगो, रेकॉर्ड बुक निर्मळे यांना मिळाले आहे. कोल्हापूर च नाव जगात भारी करण्यासाठी ही धडपड असल्याचे नामदेव निर्मळे  सांगितले.


        दिगंबर वाघ
      कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८
     


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏