कोरोना युध्दाचा मुसंलोंडी ग्रामपंचायतीकडून सत्कार

कोरोना (कोविड-१९) महामारी काळात महत्त्वाची कामगिरी



मुंबई प्रतिनिधी अनंत सोलकर : कोरोना महामारी काळात  महत्वाची कामगिरी बजावणार्‍या कोरोना योद्ध्यांचा ग्रामस्थांकडून सत्कार कोरोना सारख्या महामारी मध्ये  गावामध्ये देखील डॉक्टर सरकारी डॉक्टर नर्स पोलीस पाटील त्याच प्रमाणे खास करून आशा सेविकांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे त्यापैकी गुहागर तालुक्यातील मुसंलोंडी गावातील आकांक्षा मंगेश  सोलकर हिचा देखील ग्रामस्थांकडून सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्याचप्रमाणे दोन महिन्यापूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात अनेक गावांची विद्युत सेवा खंडित झाली होती  अशा स्थितीत पावसाळ्यात अहोरात्र मेहनत घेऊन ग्रामस्थां सोबत विद्युत जोडणी चे काम करणारे वायरमन चांगो कमळू पदीर यांचाही सत्कार करण्यात आला  ग्रामस्थांनी केलेल्या सत्कारा बद्दल दोघानिही ग्रामस्थांनचे आभार मानले.


     दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏