आनंद गोसकी यांना शासनाकडुन सन्मानपञ देऊन गौरवण्यात आले

जनआधार फाऊंडेशनचे संस्थापक आनंद गोसकी यांना शासनाकडुन सन्मानपञ देऊन गौरवण्यात आलेसोलापुर प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाउनच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता समाजकार्य करणाऱ्या सोलापूर शहरातील जनआधार फाऊंडेशन यांच्या कडुन बेघर,मनोरूग्ण,व गरजुंना लाॅकडाउन मुळे भुखबळी पडता कामा नये म्हणुन शासनाचे आदेश पाळत  जनआधार फाऊंडेशन कडुन अनेक सामाजउपयोगी कार्य कोरोनाच्या काळात अनेक लोकांना माणुसकीच्या नात्यांने मदत करण्यात आले. जनआधार फाऊंडेशनच्या कार्याची शासनाने दखल घेउन  उपजिल्हाअधिकार्यांच्या हस्ते जनाधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आनंद गोसकी यांना सन्मानपञ देऊन सन्मानित करण्यात आल. 
       कोरोना सारख्या महामारीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जवळपास ३००० लोकांची थर्मल स्क्रिनिंग द्ववारे घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली व कोरोना या महामारी विषयी सोलापूर शहरात जनजागृतीच्या माध्यमातुन नागरिकांना घरात राहून सहकार्य करण्याची विनंती केली.  जनआधार फाऊंडेशन कडुन साखर पेठ परीसरातील घरोघरी जावुन ३००० मास्क  सेनिटायझर बाॅटल वाटप  केली.बेघर,गरजू लोकांना २१ मार्च पासून आजपर्यंत दोन वेळेचे जेवण देत आहे.आयुष मंञालयाने शिफारस केलेल्या अर्सेनिक अल्बम ३० च्या गोळ्या १००० पेक्षा ही अधिक कुटूंबांना मोफत घरोघरी जाऊन आनंद गोसकी मिञ परिवाराकडून वाटप करण्यात आले.कोरोनामुळे भितीचे वातावरण असल्यांने आपल्या परीसरातील लोकांनी हाॅस्पिटलला जाणे शक्य नसल्याने डाॅक्टर आपल्या दारी हा उपक्रम राबवून ३०४नागरीकांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधे वाटप करण्यात आले.कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन आनंद गोसकी यांच्या वाढदिवसानिम्मित्त १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.आनंद गोसकी यांनी निस्वार्थ भावनेतून केलेल्या रूग्णसेवेची व इतर सामाजिक कार्याची दखल घेउन महाराष्ट्र शासनाकडुन उपजिल्हाअधिकारी  शैलैश सुर्यंवंशी यांच्या हस्ते सन्मानपञ देवुन सन्मानित करण्यात आले. हीच जनआधार फाऊंडेशन यांच्या कार्याची पोहोच पावती आहे. 
     त्यावेळी  जनआधार फाऊंडेशनचे  पदअधिकारी व आकाश बुर्ला,महेश दासी,शुभम मिठ्ठा,वसंत कामुर्ती  उपस्थित होते.


      दिगंबर वाघ             


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏