१८ कोटी रुपयांचा दंड वसूल

लॉकडाऊनच्या काळात राज्यात कोविड संदर्भात 


२ लाख १९ हजार गुन्हे


१८ कोटी रुपयांची दंड आकारणी


६ लाख ८२ हजार पास                                             


   -गृहमंत्री अनिल देशमुखमुंबई प्रतिनिधी :  लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार  २ लाख १९ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात  लॉकडाऊनच्या कालावधीत म्हणजे दि.२२ मार्च ते १ ऑगस्ट पर्यंत  कलम १८८ नुसार  २,१९,९७५   गुन्हे नोंद झाले असून ३२,४६७ व्यक्तींना अटक करण्यात आली, यातील विविध गुन्हांसाठी  १८ कोटी २४ लाख४६ हजार १०४ रु. दंड आकारण्यात आला.    तसेच अत्यावश्यक सेवेसाठी ६ लाख ८२  हजार ५५५  पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले.


कडक कारवाई


      कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या ३२४ घटना घडल्या. त्यात ८८३ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.


१०० नंबर- १ लाख ९ हजार  फोन


      पोलीस विभागाचा  १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  १,०९,०६२ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ८२४ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. अशी माहिती  देशमुख यांनी दिली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३४६ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले.


पोलिस कोरोना कक्ष


      कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील ५१ पोलीस व ४ अधिकारी अशा एकूण ५५, ठाणे शहर १२  व ठाणे ग्रामीण २ व १ अधिकारी, रायगड २,पुणे शहर ३, नाशिक शहर १,सोलापूर शहर ३,अमरावती शहर १ wpc,मुंबई रेल्वे ४,नाशिक ग्रामीण ३,जळगाव ग्रामीण १,जालना SRPF १ अधिकारी, नवी मुंबई  SRPF १, पालघर ग्रामीण २ व १ अधिकारी, ए.टी.एस. १, उस्मानाबाद १, औरंगाबाद शहर १, जालना ग्रामीण १, नवी मुंबई १, सातारा१, अहमदनगर १,औरंगाबाद रेल्वे १, SRPF अमरावती १, अशा १०२ पोलिस बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या २२४ पोलीस अधिकारी व १७१० पोलीस कोरोना  बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


नागरिकाचा सहभाग अपेक्षित


         कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.


     दिगंबर वाघ                


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏