शिक्षक भारतीच्या प्रयत्नांना यश

शिक्षक भारतीच्या प्रयत्नांना यशमुंबई प्रतिनिधी :  विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील आणि दिवसा कनिष्ठ महाविद्यालयातील दुबार शिक्षकांचे अर्धवेळ पदावरील वेतन ऑफलाइन पद्धतीने अदा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसे पत्र शालेय शिक्षण विभागाच्या कक्ष अधिकारी  कविता तोंडे यांनी आमदार कपिल पाटील यांना दिले आहे. नऊ महिन्यापासून विनावेतन काम करणाऱ्या  दुबार शिक्षकांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली. १७ मे २०१७ रोजी  शिक्षण विभागाने अन्यायकारक शासन निर्णय  काढून दुबार शिक्षकांचे वेतन बंद केले होते. रात्र कनिष्ठ महाविद्यालयात अतिरिक्त शिक्षक नसल्याने दुबार काम करणाऱ्या शिक्षकांचे वेतन पूर्ववत सुरू करण्यात आले होते. परंतु डिसेंबर २०१९ पासून ऑनलाइन प्रक्रियेततून वगळण्यात आल्याने  दुबार  काम करणाऱ्या रात्र कनिष्ठ महाविद्यालयातील व दिवसा कनिष्ठ महाविद्यालयात अर्धवेळ पदावर काम करणाऱ्या शिक्षकांचे पगार बंद करण्यात आले होते.  याविरोधात शिक्षक भारती ने शिक्षण उपसंचालक कार्यालयावर अनेकदा निदर्शने केली. तसेच आमदार कपिल पाटील यांनीही सातत्याने पाठपुरावा केला होता.


    शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दुबार काम करणाऱ्या रात्र कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे पगार पूर्ववत सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानुसार १६ सप्टेंबर २०२० रोजी पुढील आदेश येईपर्यंत ऑफलाईन पगार काढण्याचे मंजुरी देण्यात आली आहे. याच बैठकीत माननीय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी १७ मे २०१७ चा शासन निर्णय रद्द करण्याचेही मान्य केलेले आहे. याबाबतही लवकरच आदेश निघतील अशी अपेक्षा आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केली.


  दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..