जाहीर प्रगटन

तहसील कार्यालय फुलंब्री, जि. औरंगाबाद 

Emial id: tahsildarphum@gmail.com

जा.क्र. २०२०/कुळ/जा. प्रगटन/कावी-७०  दिनांक : २०/१०/२०२०

(हैद्राबाद कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९५० चे कलम ३८ (इ) (फ) व ३८ (५)(६) अन्वये)

       जाहीर प्रगटन

   याद्वारे तमाम नागरीकांना कळविण्यात येते की, अर्जदार श्री. भिमराव वाळूबावाघ, श्री. कैलास शामराव वाघ, श्री. वसंत सखाराम वाघ, श्री. कारभारी भिका वाघ, श्री. माणिकराव लक्ष्मण वाघ व इतर २१ सर्व रा. बाबरा ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद यांनी हैद्राबाद कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९५०चे कलम ३८ (इ)(फ)व ३८ (५)(६) अन्वये मौजे बाबरा ता. फलंबी, जि. औरंगाबाद येथील सर्व्हे नं.१८० व त्याचा गट नं. ४८२ मधील एकूण क्षेत्रफळ हिश्शयाची ९ हे. ७४ गुंठे पैकी अर्जदाराचे आजोबा/वडील नामे कै. लक्ष्मण शामा वाघ (मयत) यांच्या हिश्श्याची ९ हे ७४ गुंठे ही जमीन हैद्राबाद कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम १९५० चे कलम - ८ नुसार कुळ असल्याचे घोषित करण्यात यावे व कलम-३८(इ)(फ) व ३८(५) व (६) नुसार कुळाची वाजवी किंमत भरुन घेऊन अर्जदारास कुळाचे प्रमाणपत्र मिळणेबाबत | वरील प्रमाणे अर्जदार यांनी विनंती केली आहे.

    सदर प्रकरणात यान्यायाधिकरणासमोर सुनावणीसुरु आहे. तरीपुढील तारीख २९/१०/२०२० रोजी सकाळी ११.०० वाजता ठेवण्यात अली असून सुनावणी तहसीलदार, तहसिल कार्यालय, फुलंबीयांचे दालनात होणार असून ज्यांचेसदर जमीनीमध्ये हितसंबंध असल्यास आपले लेखी म्हणणे मांडावे.

     नमूद वेळी आपण सुनावणीस हजर होऊन म्हणणे न मांडल्यास सदर प्रकरणात नंतर कोणतेही म्हणणे ऐकूण घेतले जाणार नाही व नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

ठिकाण : फुलंब्री   दि. २०/१०/२०२०       

             सही                     
      (सुरेंद्र देशमुख)

तहसीलदार, तथा अध्यक्ष शेतजमीन न्यायाधिकरण, फुलंब्री.

 

दिगंबर वाघ  

कार्यकारी संपादक-९४०४४५३५८

 

माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..