मुख्यमंत्री बुधवारी उस्मानाबाद दौऱ्यावर

अतिवृष्टीग्रस्त भागांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी उस्मानाबाद दौऱ्यावरमुंबई प्रतिनिधी :   अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवार दि. २१ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.यात ते जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देतील, तसेच शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधतील.


मुख्यमंत्र्यांचा दौरा कार्यक्रम :


    स.९.३० वा. सोलापूर शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने काटगावकडे (ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) प्रयाण, स.१०.१५ वा. काटगाव येथे आगमन, अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी. स. १०.१५ वा. काटगाव येथून तुळजापूर मार्गे अपसिंगा (ता. तुळजापूरकडे) प्रयाण. स. ११.१५ वा. अपसिंगा येथे आगमन व अतिवृष्टीमुळे घरांची पडझड व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी. स. ११.३५ वा. अपसिंगा येथून तुळजापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी १२.२० वा. पूर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, व अभ्यागताच्या भेटी राखीव. दु. १ ते १.४५ वाजेपर्यंत राखीव. दु. १. ४५ वा. शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथून सोलापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण  व ३.३० वा. सोलापूर येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.


अतिवृष्टीग्रस्तांना लवकरात लवकर मदत


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही


     सोलापूर  हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. संभाव्य संकटात एकही जीव गमावता कामा नये, काळजी करु नका, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागास भेट देवून ग्रामस्थांसोबत संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर बोरी नदी व परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली.


      यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी मंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार विनायक राऊत, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, प्रणिती शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, विभागीय आयुक्त सौरभ राव, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते सांगवी खुर्द येथील  शेतकरी काशिनाथ शेरीकर यांना रु.95 हजार 100 रुपयांचा मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.