माजी राष्ट्रपती मंत्रालयात वाचन प्रेरणा दिन साजरा यांच्या जन्मदिनानिमित्त

माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त


मंत्रालयात वाचन प्रेरणा दिन साजरा



मुंबई प्रतिनिधी : माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसानिमित्त आज मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून वाचन प्रेरणा दिनाची सुरूवात केली.


    कार्यक्रमस्थळी विविध पुस्तके ठेवण्यात आली होती. तसेच रांगोळीद्वारे डॉ. कलाम यांचे चित्र रेखाटण्यात आले होते. या कार्यक्रमास मराठी भाषा विभागाचे उपसचिव हर्षवर्धन जाधव, अवर सचिव यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मराठी भाषा विभाग व इतर विभागाच्या सहकार्याने वाचन प्रेरणा दिनानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


 दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..