स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
मुंबई प्रतिनिधी : हैदराबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते, महाराष्ट्र राज्य निर्मितीचे शिल्पकार स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचे, त्यागाचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले आहे. स्वामीजींनी हैदराबाद संस्थानातल्या मराठी, तेलुगू, कन्नड अशा भिन्न भाषिकांना एकत्र आणून हैदराबाद मुक्तीचा लढा लढला. हैदराबाद संस्थानाचे भारतातले विलिनीकरण, मराठवाडा मुक्ती संग्रामातले यश, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती या ऐतिहासिक घटनांमागे स्वामीजींची दूरदृष्टी, प्रेरणा, त्याग आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वामीजींना आदरांजली वाहिली.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या जडणघडणीत स्वामीजींचे मोठे योगदान आहे. राजकारण, समाजकारणाच्या बरोबरीने त्यांनी देशात शैक्षणिक चळवळ राबवली. अखंड भारताचे निर्माते, मराठवाड्याचे मुक्तीदाते म्हणून ते कायम स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८
माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..